पुणे ग्रामीण दि २० :- पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील अवैद्य धंदे व गुन्हेगारीला आळा बसावा या साठी अवैध धंदे व अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार मागील काही आठवड्यातच दहशतवादविरोधी कक्ष पुणे ग्रामीण यांनी शिरूर येथे मोठी कारवाई केली होती त्यानंतर पुढील कारवायांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण LCB टिमने पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय मिळालेल्या बातमीनुसार लोणीकाळभोर पो.स्टे. हद्दीत मौजे लोणी स्टेशन चौक, मनोहर क्लॉथसमोर ता.हवेली जि.पुणे येथून आरोपी नामे प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे वय २१ रा.शांतीसागर वसाहत , हडपसर पुणे यास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव बाळगलेले १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस असा एकुण किं.रु. ५ हजार,३०० रूपये चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. व यातील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी हडपसर पो.स्टे. पुणे शहर येथे दरोडा तयारी, घरफोडी, विनयभंग व दुखापत असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,स.फौ. राजेंद्र थोरात पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पो.ना. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, चा.पोहवा. प्रमोद नवले यांनी केलेली आहे.