पुणे दि २१ : – कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या देशातील पोलिस अधिकारी कर्मचारी व जवानांना पुणे शहर पोलिसांच्या वतीने मानवंदना देत अभिवादन करण्यात आले. पोलीस स्मृतिदिन संचलन २१ ऑक्टोबर २०२० शोक कवायत मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना
आपले कर्तव्य बजावत असताना , वीरमरण आले , अशा संपुर्ण भारत देशातील सर्व राज्यामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे स्मृतिला आज दि .२१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ०७/३० वा . ते ० ९ / 00 वा . चे दरम्यान पाषाण रोड स्थित महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र ( सीपीआर ) , पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली . २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील
विविध पोलीस दलाचेवतीने पोलीस स्मृतिदिन म्हणुन पाळला जातो . लडाख येथे दि .२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी , सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्व तयारीनिशी अचानक हल्ला केला . त्यावेळी त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले . तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस
देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो . पोलीस स्मृतीदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले , त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते व आज पुणे येथे पाषाण रोडवर
महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र , ( सीपीआर ) , पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ०८/०० वा . सौरभ राव , विभागीय आयुक्त , पुणे विभाग , पुणे यांनी तसेच अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , अतुलचंद्र कुलकर्णी , अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग , म.राज्य , पुणे.रितेश कुमार , अपर पोलीस महासंचालक बिनतारी संदेश विभाग , पुणे .कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , पुणे शहर .प्रदिप देशपांडे , संचालक व विशेष पोलीस
महानिरीक्षक , म.राज्य.जालींदर सुपेकर अपर पोलीस आयुक्त , प्रशासन , पुणे शहर .संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर.अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर .नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर , अभिनव देशमुख , पोलीस अधिक्षक , पुणे ग्रामीण व इतर मान्यवर यांचे हस्ते पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले . दि .१ सप्टेबर २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत महाराष्ट्रातील १.पो.उप.निरी.धनाजी तानाजी होनमाने २.पो.ना.रितेश देवराओजी भोपरे ३.पो.ना.सुनिल महादेव मेश्राम ४.पो.ना.शहाजी बाबुराव हजारे ४.पो.शि. किशोर लक्ष्मण आत्राम असे एकुण ०५ पोलीस जवान कर्तव्यावर असताना शहिद झाले . या प्रसंगी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते . शोक कवातीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालया व पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील प्रत्येकी एक प्लाटुन अशा एकुण दोन प्लाटुन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचा – यांनी भाग घेतला . तसेच पोलीस मुख्यालय , पुणे शहरकडील वाद्य – वृंदयांनी भाग घेतला होता . परेड कमांडर सहा.पोलीस आयुक्त , पै.विजय चौधरी , वाहतुक विभाग , पुणे शहर व सेकंड कमांडर रामकृष्ण गोटमवाड , राखीव पोलीस निरीक्षक , पोलीस मुख्यालय , शिवाजीनगर , पुणे शहर यांनी कवायतीचे नेतृत्व केले . १ सप्टेंबर २०१ ९ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधील आपले कर्तव्य बजावित असताना वीर प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान अशा एकुण २६४ जवानांच्या नावाच्या यादींचे वाचन शोक कवायतीचे दरम्यान सुरेंद्रनाथ देशमुख , सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर व गजानन टोपे , सहा.पोलीस आयुक्त , फरासखाना पो स्टे , पुणे शहर यांनी केले . या कार्यक्रमासाठी पुणे शहर आयुक्तालय , पुणे ग्रामीण , बिनतारी संदेश विभाग , गुन्हे अन्वेषण विभाग , म.राज्य , पुणे , मोटार परिवहन विभाग , पुणे या विभागातील ९ ५ वरिष्ठ पोलीस अधिकारी व ११५ कर्मचारी हजर होते .