पुणे दि २१ :- मेणबत्त्या पेटवून रेल्वे प्रशासनाकडून वारंवार झालेल्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात अखिल भारतीय स्टेशन मास्टर असोसिएशनच्या मदतीने इतर डिविजनने देशभरातील सर्व स्थानकांवर मेणबत्ती तसेच शर्टावर काळ्या फिती लावून आंदोलन जागृत केले.
रेल्वे प्रशासन खासगीकरणासाठी सतत निर्णय घेत आहेत . कर्मचार्यांनी वारंवार आंदोलन करूनही रेल्वे प्रशासन खासगीकरणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास किंवा मागे घेण्यास तयार नाही.करोनामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे कर्मचार्यांचा 1.5 वर्षाचा डीए बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .संपूर्ण देशामध्ये करोनाच्या वेळी जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता, तेव्हा रेल्वे कर्मचारी त्यांच्या जीवाची पर्वा न करता 24 तास ड्युटी करत होते, परंतु रेल्वे प्रशासन त्यांच्याकडे, त्यांच्या सुविधांकडे पहाण्याऐवजी काही इतर निर्णय घेण्यात व्यस्त होते. वारंवार मागणी करूनही रेल्वे कर्मचा्यांना विमा देण्यात आलेला नाही.रात्री काम करताना रेल्वे कर्मचार्याना मिळणाऱ्या नाईट ड्युटी भत्त्यावर रेल्वे प्रशासनाने नुकतीच सीलिंग लावली आहे, या सर्व चूकीच्या निर्णयामुळे आणि सुरक्षेसंदर्भात रात्रभर कर्तव्य बजावणार्या रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी आहे.या सर्व कारणास्तव आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी रेल्वे आयकॉन समजल्या जाणार्या पुण्यातील 354 स्टेशन मास्तर्स यांनी रेल्वे स्थानकांवर मेणबत्त्या आणि काळ्या फिती लावून या निर्णयाविरोधात निषेध आणि इशारा दिला.रेल्वे प्रशासन कृपया जागे व्हा आणि कर्मचार्यांबाबत घेतलेले चुकीचे निर्णय त्वरित परत घ्या. अश्या शब्दांत अखिल भारतीय रेल्वे संघटनेचे अध्यक्ष मा.धनंजय चंद्रात्रय तसेच पुणे डिविजनचे अध्यक्ष मा. अमित कुमार , सचिव मा. शकिल ईनामदार आणि अँडिशनल डिविजनल प्रेसिडेंट मा. दिनेश कांबळे यांनी पुणे डिआरएम यांना निवेदन दिले आहे .