पुणे दि २ :- बँक ऑफ बडोदाच्या जिजिया कराच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे कंबरतोड आंदोलन . बँकांनी दि १ नोव्हेंबर २०२० पासून बँकेतील ग्राहक – ठेवीदारांसाठी नविन कायदा आंमलात आणलेला आहे . बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेने ठेवीदारांना त्यांच्या खात्यावर पैसे भरण्यासाठी महिन्यातून तीन वेळा मान्यता दिलेली आहे . त्यापेक्षा जास्त वेळा ग्राहकांनी त्यांचे खात्यामध्ये पैसे भरल्यास प्रत्येक भरण्याला रू . ४० / – असा आकार ठेवीदारांवर लादला गेला आहे . तसेच खातेदारांना त्यांचे पैसे काढण्यासाठी महिन्यातून तीन वेळा मान्यता दिलली आहे . त्यापेक्षा जास्त वेळा रक्कम काढल्यास प्रत्येक नोंदीस रू १५० असा आकार ठेवीदारांना लादला आहे . या नविन कायद्यामुळे बँक ठेवीदारांचे नाहक नुकसान होऊन त्यांचे खिसे कापण्याचा बँकांचा ईरादा आहे असे दिसून येते . बँक ऑफ बडोदाच्या या कायद्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने बँक ऑफ बडोदा , मार्केट यार्ड शाखेच्या बाहेर “ कंबर तोड ‘ आंदोलन करण्यात आले . या प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या . पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की , मोदी सरकारने बँकेतल्या ठेवीदारांवर “ जिजिया कर ” लादला आहे . “ अच्छे दिन ” चे स्वप्ने दाखविणारे मोदी सरकार आज सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे . १० दिवसांवर दिवाळी आली असताना अशा प्रकारचे कायदे लागू करण्यामध्ये केंद्र सरकारने ठेवीदारांना दिलेली हि दिवाळी भेटच आहे . कोरोनामुळे अनेक गोर – गरीबांची नोकरी गेलेली आहे , तसेच सर्व उद्योगधंदे ठप्प झालेले आहे . काही लोकांच्या पगारात कपात केलेली आहे . अशा संकटकाळाच्या परिस्थितीत जनतेने त्यांच्याच पैशावर कर द्यावा लागत आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे . पूर्वी मोदी सरकारने नोट बंदी करून सामान्य जनतेला वेठीस धरले होते . अनेकांना रांगेत थांबून आपले पैसे काढण्यासाठी जीव गमवावा लागला होता . मोदी सरकारच्या या कायद्याचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने मी तिव्र निषेध करतो .