पुणे, दि. ४- मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार ०३-पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा पुणे विभागाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी दिनांक ५ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी ४.३० वा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ यांच्याकडे (कौन्सिल हॉल) आयोजित करण्यात आली आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सौरभ रावविभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ यांनी केले आहे.