पुणे दि ६:-पुणे शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे शेतमजूर महिलेवर अज्ञातांनी हल्ला केल्याची दुदैुर्वी घटना घडली. या अत्याचारग्रस्त पीडितेवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी’ व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांच्यासोबत संबंधित विषयावरती चर्चा करून लवकरात लवकर आरोपींना अटक करून कडक कारवाई व्हावी असे आदेश दिले त्यावेळी पुणे शहरी अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक तसेच पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे ,युवा मोर्चा प्रदेश सदस्य प्रा.सचिन
जायभाये, बाप्पु मानकर होते व पीडित महिलेने त्यादिवशी नेमके काय घडले ते मी सर्व सांगेन… आरोपींना मी ओळखते.. त्या नराधमांनी माझ्यावर काय-काय अत्याचार केले हे पण सांगेन… पण मला माझे दोन्ही डोळे परत द्या… अशी आर्त विनवणी शिरुर घटनेतील पीडित महिलने आज केली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज (शुक्रवारी) पुण्यात ससून रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर पीडितेने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. व
शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एका महिलेवर क्रूर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला.या प्रकरणातील नराधमांना तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली.न्हावऱ्यातील घटना अतिशय गंभीर आणि भयंकर आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पुण्याच्या प्रशासनाने अशा घटनांची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. हाथरसच्या घटनेचा बोलकाना देशभर आरडाओरड करणारे आता कुठे झोपले आहेत, असा सवाल यावेळी प्रवीण दरेकर यांनी विचारला.हाथरससारख्या घटना रोज मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत, परंतु हाथरसच्या घटनेचे राजकारण झाले. पण आता या शिरुरच्या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि हा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. नाही तर रोज शिरुरसारख्या घटनेप्रमाणे महिलांना अत्याचारांच्या प्रसंगांना सोमोरे जावे लागेल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची या प्रकरणासंदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.शिरुरच्या निर्दयी घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करा. पुण्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव असणा-या शहराला असे प्रकार शोभणारे नाही. पोलिसांचा धाक दरारा संपला आहे. सरकार पण सध्या सत्तेच्या मस्तीत आहे. त्यांना अश्या महिला अत्याचाराच्या गंभीर घटनांकडे बघायला वेळ नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.पिडीत महिलेवर तातडीने योग्य उपचार करुन तिला तिची गेलेली दृष्टी पुन्हा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या व त्या महिलेवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना सूसन रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे यांना दरेकर यांनी दिल्या. भाजपच्यावतीने पिडीत महिलेला व तिच्या कुटुंबियांला नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा धीर दरेकरांनी पीडित कुटुंबाला आश्वासन दिले