पिंपरी चिंचवड दि ०६ :- चिंचवड वाहतुक विभागांतर्ग येणाऱ्या अहिंसा चौक येथे विनामास्क वाहनचालकांवर पोलीस कर्मचारी पोना ८२१ आबासाहेब विजयकुमार सावंत हे कारवाई करीत असताना एम एच ०१ वाय ८८३७ या क्रमांकाची फियाट उनो वाहन चालक नामे युवराज हनुवते हे चालवत होते . तेंव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता . सदर वाहन चालकास सावंत यांनी थांबवण्यासाठी इशारा केला परंतु त्यांनी त्यांचेकडे जाणीवपुर्क दुर्लक्ष करुन वाहन बाजुला न करता तसेच पुढे नेण्याचा प्रयत्न केला.परंतु ट्राफिक जाम असल्याने चालकास पुढे निघुन जाता आले नाही. तेंव्हा सावंत यांनी वाहनाच्या पुढे जाऊन बॉनेटवर हाथ ठेवुन वाहन बाजुला घेण्यास सांगितले .परंतु तरिदेखील चालक वाहन बाजुला घेत नव्हता .चालकांनी वाहन रेस करत सावंत यांना मागे नेत वाहन रेटत होते . अशा स्थितीत सदर वाहन चालकाने चारचाकी अंदाजे ५० मिटर पर्यंत रेटली . सदर
परिस्थिती पाहुन त्यांचे सहकारी व कर्माचारी हे कार चालकाला समजावत वाहन बाजुला घेण्यास सांगत होते . परंतु तो वाहन बाजुला घेण्याच्या मनस्थितीत नव्हता . वाहनचालकाशी बोलत असतानाच अचानक चालकाने वाहन एक्सलरेट वाढवून पुढे पळविले , त्यामुळे समोर उभे असलेले पोना सावंत यांचा गुडघ्याला इजा झाली व ते बोनेटवर पडले त्यामुळे त्यांचे उजव्या गुडग्भ्यास गंभीर दुखापत झाली . परंतु चालकाचे त्याकडे दुर्लक्ष करुन सदर फियाट उनो ही एल्प्रो कंपनी ते चाफेकर चौक मार्गे पिएन जी ज्वेलर्स पर्यंत अंदाजे ८०० मिटर पर्यंत पोना सावंत यांना कारच्या बोनेटवर बसलेल्या स्थितीतच वाहन पळविले . त्यादरम्यान आजुबाजुच्या लोकांनी , रिक्षा चालकांनी दुचाकी स्वारांनी सदर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला , परंतु चालक इसम हा कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितित नव्हता . तेंव्हा त्याचा पाठलाग करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी पुढे जाणाणाऱ्या झायलो गाडीस रस्त्याच्या मध्ये थांबवुन सदर वाहनचालकास वाहन थांबविण्यात भाग पाडले . त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली आहे . नमुद घटनेमध्ये पोना सांवत यांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता . परंतु यांनी धाडसाने कर्तव्यदक्ष राहुन प्रसंगावधान राखुन स्वतःचा बचाव केला आहे . पोलीस नाईक सावंत यांनी प्रसंगावधान ठेऊन पोलीस दलाचे कर्तव्याप्रती निष्ठा राखली . त्यांनी केलेल्या मनोधैर्य वाढविणाऱ्या कामगिरिबद्दल पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी , अभिनंदन करुन मनोधैर्य वाढवले आहे . i