पुणे दि २० :- चतुःशृंगी पो.स्टे . परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारावर चतुःश्रृंगी पो.स्टे . हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम नामे शुभम राजेंद्र हिंगाडे वय .२६ रा.वैद्य बंगला , नमन सोसा.फ्लॅट नं .८०३ , ज्ञानेश्वर पादुका चौक , शिवाजीनगर पुणे .५ हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे . त्याने त्यांच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता , चाकू , तलवार , यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन जबरी दुखापत , या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते व . त्याची गुन्हेगारी कृत्ये सन २०१९ पासून चालू होती त्याचेविरूध्द ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत . त्याचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसलेचे पोलिसांना दिसून आले होते व त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेला होता . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,अनिल शेवाळे , चतुःशृंगी पो . स्टे . पुणे शहर . यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचेकडे सादर केला होता.व अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे विरुध्द दिनांक २०/११/२०२० रोजी एम.पी.डी.ए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले असून त्यास दि .२० / ११ / २०२० रोजी सदर आदेशानुसार स्थानबध्द करुन येरवडा कारागृह , पुणे . येथे ठेवण्यात आले आहे . पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलं बिले आहे . त्यानुसार चालु वर्षामध्ये ०६ गुन्हेगारांना एम.पी.डी.ए कायदयान्वये स्थानबध्द केले असून आगामी काळात जास्तीत जास्त सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये करुन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यांचे चतुःशृंगी पोलिसांनी ठरविले आहे ..