पुणे दि २४ : – पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे शहर पोलिसांना यश आले असून, त्यांना जयपूर येथे गुन्हे शाखेने युनिट १ सर्व टीम यांनी ताब्यात घेतले आहे. व काही दिवसापूर्वी पुणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंद करण्यात आली होती, व त्यांच्या मुलांनी काही जणांवर संशय व्यक्त करत पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू केला होता व त्या.दरम्यान, बेपत्ता झाल्यानंतर गौतम पाषाणकर हे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग भागात दिसून आले होते. पण त्यानंतर ते कोठेच सीसीटीव्हीत दिसून आले नव्हते. यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू हाेता.
या दरम्यान कोल्हापूर शहरात दिसून आल्याचे समोर आले हाेते. येथील एका हॉटेलमध्ये ते राहिले आहेत. हे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले. त्यांनी पाषाणकर यांच्या कुटुंबाला ते दाखविले. त्यावेळी त्यांनीदेखील त्यावेळी ओळखले आहे. त्यानुसार कोल्हापूर येथे गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. तसेच त्यांचा शोध सुरू केला.दरम्यान, पाषाणकर हे कोकणात गेले असावेत, अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होते. त्यानुसार त्यांचा या भागात शोध घेतला जात होता. व काही गोपनीय माहितीवरून पुणे शहर पोलिसांनी आज पाषाणकर जयपूर येथे मिळून आले आहेत. आता त्यांच्या बेपत्ता होण्यामागची अनेक कारणे आद्यप स्पष्ट झालेली नाहीत.