अमरावती दि २३ :- महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे (सोलापूर) उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर (जळगाव) तर सचिवपदी ॲड. अद्वैत चव्हाण (अमरावती) यांची आँनलाईन लोकशाही पद्धतीने व बहुमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशनची (MDMA) दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी कायकारिणी निवड करण्यासाठी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सदस्य यांनी लोकशाही पद्धतीने आपले मत नोंदवून संघटनेची कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) अध्यक्षपदी दत्तात्रय नाईकनवरे, उपाध्यक्षपदी जितेंद्र ठाकूर, सचिवपदी ॲड अद्वैत चव्हाण, सहसचिवपदी अनुप फंड, कोषाध्यक्षपदी सैफन शेख, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विनायक शिंदे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.प्रवीण सेलूकर, महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी गोपाल वाढे यांची तर संचालक पदी महादेव हरणे, आनंद भिमटे अशी कायकारिणी लोकशाही पद्धतीने निवड केली आहे.
सामाजिक शैक्षणिक सहकार राजकीय धार्मिक वगैरे कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना संघटनेला महत्व आहे. अलिकडील ३/५ वर्षात डिजिटल मिडियाचे महत्त्व वाढले असून केंद्र सरकारने डिजिटल मिडियाला मेनस्ट्रीम मिडिया म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील असून राष्ट्रपती यांनीही स्वाक्षरी केली आहे. डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार, प्रतिनिधी व संपादक बांधव यांच्या न्याय हक्कासाठी काम पाहणाऱ्या देशातील पहिल्या असोसिएशन ऑफ डिजिटल मिडिया अॅण्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटनेच्या यशस्वीतेनंतर महाराष्ट्र डिजिटल मिडियाअसोसिएशनची (MDMA) स्थापना करण्यात आली आहे. डिजिटल मीडियामधील पत्रकारांना संघटीत करून त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) काम करणार आहे. या महाराष्ट्र डिजिटल मिडियाअसोसिएशन (MDMA) संघटनेची महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिली लोकशाही मार्गाने काम करणारी एकमेव संघटना आहे.कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन कायकारिणी निवड आँनलाईन पध्दतीने करण्यात आली. उपस्थित सर्व सदस्यांनी लोकशाही मार्गाने आपले मत नोंदवून पदाधिकारी यांची निवड केली. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून ॲड अद्वैत चव्हाण यांनी काम पाहिले. महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांची नेमणूक करावयाची असून डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार, प्रतिनिधी व संपादक यांनी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन महाराष्ट्र (MDMA) अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे मोबाईल ९४२१०७५९३१, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर मोबाईल ९४२३६५८१८१, सचिव ॲड अद्वैत चव्हाण मोबाईल ९८२२६६८७८६, सहसचिव अनुप फंड मोबाईल ८९५६९१०७०७, कोषाध्यक्ष सैफन शेख मोबाईल९४८३२२२१११, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनायक शिंदे मोबाईल ९५०३३९२७३७, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रविण कुमार सेलूकर मोबाईल ९८६००८३५७३ व महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल वाढे मोबाईल ८३०८४४४९३४, संचालक महादेव हरणे मोबाईल ९१३००९०४४४ व आनंद भिमटे मोबाईल ७७४५८३५३२६ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.