पिंपरी चिंचवड दि २६ :- पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैद्यरित्या चालु असलेल्या अंदर – बाहर जुगार अड्डयावर छापा दि. २५ नोव्हेंबर रोजी १५:४५ वाजताचे सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग , यांचे पथकाने दिघी परिसरात अवैद्यरित्या चालु असलेल्या अंदर – बाहर जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली व दिघी
परिसरात सापळा लावून पोलिसांनी जुगार अड्यावर छापा टाकून जुगार चालवणाऱ्या एकूण १२ इसमांवर कारवाई करण्यात आली .कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैद्य धंद्याबाबत प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेशीत केलेने सामाजिक सुरक्षा विभाग , पिंपरी चिंचवड यांचे पथक दिघी पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना आपले गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दिघी पोलीस ठाणे अंतर्गत , सर्वे नं .१२७ पठारे वस्ती , लोहगाव – विमानतळ रोडलगत डोगराळ भागात काही इसम अवैद्यरित्या जुगार चालवत असल्याचे समजलेने सामाजिक सुरक्षा विभाग , यांचे पथकाने सदर ठिकाणी २ कि.मी अंतर डोंगराळ भागात चालत जावून
जुगाराच्या अड्यावर यशस्वी छापा टाकून ८ लाख ३२ हजार ७३९ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे व चालक नामे १ ) अय्याज दाउद शेख वय ४३ वर्षे रा.लक्ष्मीनगर गल्ली नं २ कोढवा पुणे तसेच , सदर जुगार अड्डा मालक नामे – सुनिल ऊर्फ सोन्या कोंडीबा मुंगसे रा.दाभाडे वस्ती , चन्होली , ता.हवेली . जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश. अपर पोलीस आयुक्त.रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे . सुधीर हिरेमठ साो , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे . आर.आर.पाटील साो , यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . विठ्ठल कुबडे , सपोनि अशोक डोंगरे , सपोफौ विजय काबंळे , पोहवा सुनिल शिरसाठ , पोना भगवंता मुठे , पोना नितीन लोंढे , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , पोना अमोल शिंदे , पोशि गणेश करोटे , पोशि मारूती करचुंडे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे