पिंपरी चिंचवड दि ०८: – दिघी पोलीस ठाणे अंतर्गत , नीराधार नगर , झोपडपट्टी एमआयडीसी कॉटर्स लगत , पिंपरी पुणे येथे अवैधरित्या सुरु असलेल्या अंदर – बाहर जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी १लाख ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ८ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालक सुनिल राजेंद्र मोरे वय -३८ वर्षे रा.निराधार नगर , पिंपरी पुणे व त्याचे इतर ०७ साथिदार यांचे विरुद्ध पिपरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल ,करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैद्य धंद्याबाबत प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेशीत केलेने सामाजिक सुरक्षा विभाग , पिंपरी चिंचवड यांचे पथक पिंपरी पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना आपले गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दिघी पोलीस ठाणे अंतर्गत , नीराधार नगर , झोपडपट्टी एमआयडीसी कॉटर्स लगत , पिंपरी पुणे येथे काही इसम अवैद्यरित्या जुगार चालवत असल्याचे समजलेने सामाजिक सुरक्षा विभाग , यांचे पथकाने सदर ठिकाणी जावून दिनांक ०७ डिसेंबर रोजी १९ : ०० वाजताचे सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग , यांचे पथकाने पिंपरी पोलीस ठाणेचे हद्दीत अवैद्यरित्या चालु असलेल्या अंदर – बाहर जुगाराच्या अड्यावर जुगाराच्या अड्यावर यशस्वी छापा टाकून १लाख ८३५ रुपयेचा मुद्देमाल ताब्यात मिळून आला व पोलिसांनी ८ जनावर कारवाई केली.यात पोलिसांनी १लाख ८३५ रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे सुधीर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे आर.आर.पाटील , सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक डोंगरे , सपोफौ विजय काबंळे , पोहवा सुनिल शिरसाठ , पोना भगवंता मुठे , पोना नितीन लोंढे , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , पोना अमोल शिंदे , पोशि गणेश करोटे , पोशि मारूती करचुंडे , पोशि योगेश तिडके यांनी केली आहे .