पुणे दि ०८ :- हडपसर परीसरात एका बिअर शॉपी चालकाच्या मॅनेजर यांना उधारीवर बियर मागून, त्यांनी बियर उधारीवर न दिल्याने आरोपी प्रतीक ऊर्फ नन्या याने रागातून टोळक्याने त्यांचे हातातील दांडक्यांने काऊंटरचे काचेवर मारुन तोडफोड करुन , तसेच लोखंडी कोयत्याने दुकानातील बियरचे बॉटल , फ्रीज , काऊंटरची काच फोडून , बियर शॉपी दुकानाचे नुकसान केले. त्यानंतर परिसरातील सलून, चिकन, किराणा माल, मेडीकल फोडून ३ हजार ८०० रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी सहाच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ ड्रीम्स आकृती सोसायटीसमोर घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी प्रतीक उर्फ नन्या नवनाथ शेंडे (वय – 18, रा. काळेपडळ) याला अटक केली आहे. त्याचे चार साथीदार फरार असून त्यामध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी प्रतीक उर्फ नन्या साथीदारांसह एस. के. बिअर शॉपीवर गेला होता. त्याने बिअर शॉपीतील कामागाराला उधारीवर बिअर मागितली. मात्र, मॅनेजरने त्यांना बिअर देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे त्याने इतर साथीदारांच्या मदतीने शॉपीच्या काउंटरची तोडफोड केली. त्यावेळी तेथे उभा असलेले श्री मेडीकलचे सुरज सुतार यांना टोळक्याने दम दिला. तू इथे उभा राहून काय तमाशा बघतोय, असे म्हणत मेडीकलचे काउंटर फोडून
मेडीकल दुकानाचे काऊंटरवर व समोरील काचेवर मारुन काच फोडुन , त्याने काऊंटरचे आत हात घालुन , गल्ल्यातील ३ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले . फिर्यादी हे त्यास विरोध करीत असताना , त्याने त्याचे हातातील लोखंडी कोयता उलटा करुन , फिर्यादी यांचे उजवे हातावर व पोटावर डावे बाजुस मारुन जखमी केले त्याशिवाय परिसरातील सलून दुकानासह किराणा दुकान आणि चिकनच्या दुकानांची तोडफोड करून नुकसान केले आहे.तोडफोड करुन , परिसरात आरडा – ओरडा करुन , त्यांचे हातातील लोखंडी कोयते व दांडके हवेत फिरवून , आम्हीच इथले दादा आहे , आमचे नादाला लागु नका , आमचे नादाला लागले तर तुमचे हात – पाय तोडुन टाकीन असे म्हणुन धमकी देऊन जात असताना , परिसरातील सर्व दुकानदारांनी आप – आपली दुकाने घाबरुन पटापट बंद केले व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड करत आहे