पुणे ग्रामीण दि ०८ : – पुणे शिरूर येथील उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक व शिपायाने जमीन मोजणी करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आसून रवींद्र नारायण शेळके (वय 29) व दीपक शिवराम ताजणे (वय 40) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र हे पुणे शिरूर येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भूकर मापक म्हणून नोकरीस आहेत. तर दीपक हा शिपाई आहे. यातील तक्रारदार यांनी जमीनमोजणी साठी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.तसेच, आवश्यक ती शासकीय फी देखील भरलेली होती. पण त्यानंतरही लोकसेवक रवींद्र यांनी 50 हजार रुपयांची लाच मागीतली होती. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार अर्ज केला होता. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा तपास चंद्रकांत चौधरी , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि.पुणे युनिट हे करत आहेत .सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व . अपर पोलीस अधीक्षक.सुरज गुरव , ला.प्र.वि.पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .