पुणे ग्रामीण दि १७ :-कोल्हेवाडी परीसरात ०३ नोव्हेंबर रोजी हवेली पोलीस स्टेशन च्या हद्दीत कोल्हेवाडी गावामध्ये फिर्यादी नामे विजय नामदेव रिंढे याचा कामगार फिर्यादी राहत असलेल्या गल्लीतून चालत येत असताना त्याचा धक्का इसम नामे आवि वासावे यांच्या पत्नीला लागल्याचे कारणावरून वादविवाद झाला होता,त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा कामगाराला व महिलेची माफी मागायला लावून वाद मिटवला होता ,परंतु सदर घटनेचा राग मनात ठेवून आरोपी आवी वसावे याने त्याच्या ७ ते ८ मित्रांच्या मदतीने फिर्यादी नामे यांस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने व स्वतःची दहशत वाढवण्यासाठी फिर्यादीचे मानेवर कोयत्याने वार करून तसेच लाकडी दांडक्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व घटनेवरून हवेली पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता,व गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे गुन्ह्यातील मुख्य आरोप आवि वसावे रा.कोल्हेवाडी ह्यास लगेच अटक करणात आली होती परंतु त्याचे इतर आरोपी साथीदारांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक करीत असताना गुन्ह्यातील इतर आरोपी १) सागर गणेश सुतार वय २१ रा.देशमुखवाडी शिंदे वोशिंग सेंटर मागे शिवणे गाव ता. हवेली जि. पुणे २)रोहित पुरण वाल्मिकी वय २० रा.एन.डी.ए रोड, कामठे वस्ती ,शिर्के बिल्डिंग ,शिवणे ता. हवेली जि पुणे हे अगळंबे फाटा ता.हवेली येथे येणार असल्याचे खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सदर ठिकाणी सापळा लावला असता त्यांना पोलिसांची चाहूल लागली असता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा 2 किमी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे ,सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी डॉ.श्री.अभिनव देशमुख सो. पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील , उपविभागीय पो. अधिकारी श्रीमती डॉ. सई भोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,पोसई अमोल गोरे, सहा.फौजदार दत्ता जगताप ,पो.कॉ २५८६/बाळासाहेब खडके,पो.कॉ २४११/अमोल शेडगे,पो.कॉ ३२५/ मंगेश भगत पो ह सागर चंद्रशेखर स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण यांनी केली आहे.