पुणे दि १७ :- पुणे भारती विध्यापीठ परीसरात गायीच्या तुपामध्ये भेसळ करणारा इसमास शिताफीने पकडून त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख ४९ हजार ७०० रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त केला.पथकांचे अधिकारी नितीन शिंदे व तपास पथकांतील कर्मचारी असे अभिनव कॉलेज , आंबेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कर्मचारी राहूल तांबे व सचिन पवार यांना त्याच्या बातमीदारमार्फतीने कळाले कि , अभिनव कॉलेज समोर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो नंबर एम . एच .१२ आर .एन . २४५० टेम्पो भेसळयुक्त गायीचे तुपाचे डब्बे विक्री करण्यासाठी येणार असल्याचे माहीती प्राप्त झाली सदर बातमीचा आशय भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी . जगन्नाथ कळसकर व पोलीस निरीक्षक , गुन्हे अर्जुन बोत्रे यांना सांगितला असता त्यांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेऊन बातमीची खातरजमा करण्याचे आदेश दिले . सदर ठिकाणी जाऊन टॅम्पो ताब्यात घेतला असता टॅम्पोमधील १५ किलो वजनाचे १०० पत्र्याचे चौकोनी डब्बे होते . डब्बामध्ये काय आहे याबाबत विचारणा करता त्यांनी गायीचे तुप असल्याचे सागितले.सदर डब्बांवर कोणतेही कंपनीचे नाव , आयएसआय मार्क , डब्यातील आतील वस्तुचे वर्णन अशी माहीती असे काहीही नमुद नव्हते तुप घेवून जाणा – याने त्याचे नाव शिवराज हळमणी , मु . पो . हात्तीकनबस , ता . अक्कलकोट जि . सोलापुर असे असल्याचे सांगितले व डीजीएम ( देवक फुडस कंपनी ) , शिवणे , पुणे येथील कंपनीतुन माल घेतला असल्याचे सागितले . सदरचे तुप भेसळयुक्त असल्याचे संशय आल्याने लागलीच सहा आयुक्त ,यांनी नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याच्या अहवालावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) सांगण्यात आले.लेबल नसलेल्या तुपाच्या डब्याची वाहतूक करणारा टेंपो भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त.केला ‘एफडीए’च्या कार्यालयाला दिली. ही माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर घटनास्थळावर गेल्या. त्यांनी तुपाचे शंभर डबे जप्त केले. त्याचे वजन सुमारे दीड हजार किलो आहे. त्याची बाजारातील किंमत चार लाख ४९ हजार ७०० रुपये आहे.तुपाचा हा साठा भेसळयुक्त व कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून तो जप्त करून त्याचे नमुने घेण्यात आले.हे तूप शिवण्यातील धावडे इंडस्ट्रियल इस्टेटमधील डी. जी. एम. इंडस्ट्रीज येथून खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथील एक हजार २३ किलो वजनाचे चार लाख ८७ हजार ५९० रुपये किमतीचे तूप जप्त केले. अस्वच्छ वातावरणात हे तूप तयार केले जात होते. त्यामुळे त्याचे नमुने घेण्यात आले. या दोन्ही ठिकाणी मिळून दोन हजार ५२२ किलो तूप जप्त केले.अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे, राजेंद्र काकडे, अर्चना झांजुर्णे, अन्वेषक राजेश आल्हाट यांनी पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त बा. म. ठाकूर आणि सी. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.अन्न सुरक्षा व मानदे कायद्याची गेल्या नऊ वर्षांपासून राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, सकल आणि निर्भेळ अन्नपदार्थ पुरवठा करणे हा या कायद्याचा उद्देश आहे.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, ‘एफडीए’, पुणे विभाग व पुढील कारवाई करीत आहे . सदरची कारवाई . डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०१ , पुणे शहर , मा . सर्जेराव बाबर , सहाय्यक पोलीस आयुक्त , स्वारगटे विभाग , पुणे शहर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर , अर्जुन बोत्रे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , भारती विदयापीठ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक , नितीन शिंदे , तपास पथकांचे पोलीस अंमलदार संतोष भापकर , सोमनाथ सुतार , रविन्द्र भोसले , सर्फराज देशमुख , सचिन पवार , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , व विक्रम सावंत यांनी कारवाई केलेली आहे .