पुणे दि २९ : – पुणे शहरात व ईतर ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावे दुचाकी घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे. टोळीकडून 30 लाख रूपये किंमतीच्या 28 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट प्रकरण करून दुचाकी लाटल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.किरणकुमार शशिकांत पेडणेकर (वय 34, रा. नायगाव, वसई) अनिल नामदेवराव नवथळे (वय 31, रा. अकोला) , प्रवीण विजय खडकबाण (वय 39, रा. नायगाव, मुंबई), देवेंद्रकुमार केशव मांझी (वय 50, रा. पालघर, मुंबई), भूषण राजेंद्र सुर्वे (वय 32, रा.धुळे), सुरेश हरिश्चंद्र मोरे (वय 41, रा. ठाणे), पंकजकुमार राजेंद्रप्रसाद सिंह (वय 30, रा. ठाणे, मूळ-वापी, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी प्रीतेश सुभाष शिंदे (रा. ठाणे, मूळ- उब्रज सातारा) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी प्रीतेश कामानिमित्त पुण्यात आले असताना, त्यांना एका बॅंकेचे कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला. मात्र, त्यांनी कर्जासाठी अर्ज केला नसल्यामुळे त्यांनी बॅंकेत फोन केला. त्यानंतर ते बॅंकेत गेले असता, त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड देउन दुचाकी बुक केली होती.त्याला बनावट धनादेशही जोडण्यात आला होता. त्यानुसार प्रीतेश यांनी सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शोरूममधून दुचाकी घेण्यासाठी टिव्हीएस शोरूम मधून ज्याने गाडी बुक केली आहे तो इसम शोरुमला आला असल्याचे समजले . तक्रारदार व सहकारनगर पोलीस ठाणेचे तपासपथकाचे अधिकारी व कर्मचारी हे शोरुमला गेले व संशयीतास ताब्यात घेवून चौकशी करता तो प्रितेश शिंदे असलेबाबत प्रथम सांगत होता तथापी त्यास अधीक विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने त्याचे खरे नाव किरणकुमार शशिकांत पेडणेकर , वय ३४ वर्षे , रा.रुम नं .१०४ , नवकर बिल्डींग , फेज २ , नायगाव ( पुर्व ) , वसई असे असलेचे व त्याने , त्याचे साथीदार नामे अनिल नवथले आणि मधुकर सोनावणे वैगेरे यांनी मिळून अशा प्रकारचे गुन्हे केलेची कबुली दिली . गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपीतांचा सहभाग निश्चित झालेने त्यांना तपासकामी अटक करणेत आलेली आहे १.किरणकुमार शशिकांत पेडणेकर , वय ३४ वर्षे , रा.नायगाव ( पुर्व ) , वसई , २.अनिल नामदेवराव नवथळे , वय ३१ वर्षे , रा.बाळापुर नाका , जुनेशहर , अकोला , ३.प्रविण विजय खडकबाण , वय ३ ९ वर्षे , रा.रिलॅबल गार्डन , नायगाव ( पुर्व ) , मुंबई , ४.देवेद्रकुमार केशव मांझी , वय ५० वर्षे , रा .६०१ , मारर्टीन प्लाजा , सुयोग नगर , वसई ( पश्चिम ) , पालघर , ५.भुषण राजेंद्र सुर्वे , वय ३२ वर्षे , रा.पाटबाजार गल्ली नं .२ जुणे धुळे , जि.धुळे , ६.सुरेश हरीचंद्र मोरे , वय ४१ वर्षे , रा.घोडबंदर रोड , वागबील नाका , ठाणे वेस्ट , ठाणे , ७.पंकजकुमार राजेन्द्रप्रसाद सिंह , वय -३० , रा.वसंत विहार , ठाणे वेस्ट मुळ रा.वापी गुजरात , यातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी – १.प्रवीण विजय खडकबाण , खालापूर – जि.रायगड , खांडेश्वर – पनवेल , कोपर खैरणे – वाशी नवी मुंबई येथे चोरी व फसवणुकीचे एकुण ७ गुन्हे नोंद आहेत , २.भुषण उर्फ भु – या राजेंद्र सुर्वे रा.धुळे याचेवर धुळे , आझादनगर , जामनेर , भद्रकाली , मनमाड व नाशीकमध्ये खुनाचा प्रयत्न , जबरी चोरी , हत्यार प्रतिबंधक कायदा , सरकारी नोकरावरील हल्ला व दारुबंदी कायद्यानुसार एकुण १६ गुन्हे नोंद आहेत , ३.सुरेश हरिशचंद्र मोरे याचे विरुध्द जुहू व खांडेश्वर पोलीस ठाणेत फसवणुकीचे दोन गुन्हे नोंद आहेत , ४ . किरणकुमार शशिकांत पेडणेकर याचे विरुध्द वाशी पोलीस ठाणेत फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे , ५ . मधुकर भगवाण सोनावले याचे विरुध्द विरार पोलीस ठाणेत फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे . – अटक आरोपीतांकडून २८ दुचाकी वाहनांसह , कागदपत्रांचे बनावटीकरण करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप , काँप्यूटर , प्रिंटर , पेनड्राईव्ह , शिक्के , मोबाईल फोन्स असा एकुण किंमत रुपये २९ लाख ९ ३ हजार १५२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.जप्त वाहनांचा समावेश आहे १.बुलेट – १ २.अॅक्टीव्हा – १,३.होंडा एसपी १२५ – १ , ४.होंडा शाईन – १ , ५.हिरो होंडा पॅशन १,६.सुझुकी एक्सेस १२५ – १२ ७. बजाज पल्सर – ३,८.होंडा युनिकॉर्न – ८ . वरील वाहने आरोपींनी खालील शहरांमधून नमुद केलेल्या शोरुम्समधुन काढलेली आहेत
१.पुणे शहर पोलीस आयुक्तालय कृष्णा रामा शोरुम चैतन्यनगर धनकवडी पुणे , २.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुडवीन शोरुम भोसरी पुणे , ३.नाशीक शहर पोलीस आयुक्तालय जितेंद्र मोटर्स सारडा सर्कल नाशीक , ऋषभ होंडा मुंबई नाका , सुझीकी शोरुम मुंबई नाका , शिवांग ॲटो मुंबई नाका , हिरो शोरुम नाशीक धिंडोरी रोड , भटटड मोटर्स ओझर रोड नाशीक.४.नवी मुंबईपोलीस आयुक्तालय – स्नेहा मोटर्स पनवेल , कनक आटोमोबाइल पनवेल , एमएटी शोरुम विरार , ५.मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय -ओम साई मोटर्स सातीवली वसई , सचीन मोटर्स बोलीन शाखा विरार , मुंबा मोटर्स चेक नाका दहीसर , ओमकार मोटर्स बोळींज विरार , नुतन ऑटोमोबाईल विरार , साईराज मोटर्स विरार , टिकम मोटर्स विरार , जी.के.मोटर्स दहिसर , यासाठी त्यांनी खालील नमुद व्यक्तींची बनावट कागदपत्र तयार करुन ती खरी आहेत असे भासवून , दुसऱ्याचे नावे कर्ज प्रकरणे मंजूर करून हडपली आहेत . त्यांनी वापर केलेली नावे खालील प्रमाणे आहेत अ ) सुनिलकुमार विजय यादव , ब ) प्रितेश सुभाष शिंदे , क ) दिपक गणपत गमरे ड ) पारसनाथ रामनारायण चौरसीया इ ) कुम्मारी प्रवीण कुमार फ ) मुफीज महंमद वेगदाणी , ग ) क्लिओ फ्लोरीयानो डिसुझा , घ ) अमोल गोपीचंद गायकवाड य ) सुरेंद्रसींग विश्राम यादव , अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या शोरुममधुन वाहन खरेदी कर्ज प्रकरणे झाली असलेस तात्काळ सहकारनगर पोलीस ठाण्यात ८२७५७२०४८७, ०२०,२४२२८११३ व ०२०,२४२२६६०४ वर संपर्क साधावा आसे आवाहन करण्यात आले आहे . सदरची कामगीरी पोलीस आयुक्त , पुणे शहर.अमिताभ गुप्ता.सहपोलीस आयुक्त , पुणे शहर.रविंद्र सिसवे.अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , डॉ.संजय शिंदे , पोलीस उपायुक्त , परिमंडळ -२ ,सागर पाटील , सहा.पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग.सर्जेराव बाबर , वपोनिरी अरुण वायकर , पो.निरी.राजेंद्र कदम ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पो.उप – निरीक्षक सुधीर घाडगे , पो.उप – निरीक्षक बापू खेंगरे , पो.हवा.बापु खुटवड , विजय मोरे , संदीप जाधव , पोलीस नाईक भुजंग इंगळे , संदिप ननवरे , सतिष चव्हाण , प्रकाश मरगजे , पोलीस शिपाई किसन ( देवा ) चव्हाण , प्रदिप बेडीस्कर , शिवलाल शिंदे यांचा समावेश होता .