पुणे दि ०१ : -चतुःश्रृंगी पोलिसांनी एका वाहन चोरांकडून ०५ लाख रुपयांच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करून आरोपी ला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहनचोरी केली असून चतुःश्रृंगी पोलिसांनी ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अमीनुर वहाब मंडल , वय २७ वर्षे रा.सध्या कपिल मल्हार सोसायटी जवळ , शिंदे पारख्खे मळा , बाणेर पुणे.मुळ – कासीपुर , पो.कुमडा , थाना हाबडा , जि .२६ , परगना , राज्य- पश्चिम बंगाल असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून प्रत्येक पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या तक्रारी येत आहे.या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस ठाणे आणि पथकांना सूचना दिल्या होत्या. व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये मागील काही महिण्यांपासुन मोटार वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती . त्यामुळे पंकज देशमुख , पोलीस उप व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक २८ डिसेंबर रोजी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्हे प्रतिबंधात्क पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक प्रकाश आव्हाड व सारस साळवी यांना मिळालेल्या बातमीवरून सदर महिती अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,पोलीस उप आयुक्त , पंकज देशमुख , परिमंडळ ४ पुणे शहर , सहा.पोलीस आयुक्त , रमेश गलांडे , खडकी विभाग पुणे शहर यांना माहिती देवून त्यांनी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , दादा गायकवाड , पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक , मोहनदास जाधव , महेश भोसले व कर्मचारी पो.हवा . दिनेश गडांकुश , मुकुंद तारू , पोना श्रीकांत वाघवले , प्रकाश आव्हाड , सारस साळवी , प्रमोद शिंदे , संतोष जाधव , ज्ञानेश्वर मुळे , आशिष निमसे , पोशि.अमोल जगताप , वसिम सिद्दीकी व तेजस चोपडे यांची टिम तयार करून पथकाने सपाळा रचून आरोपी मंडल याला ताब्यात घेतले.आसता त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी १० दुचाकी चोरल्याची कबुली दिली.आहे व मौजमजेसाठी वाहने चोरून पेट्रोल संपले नंतर वाहने सोडून देण्याऱ्या सराईत चोरटयास चतुःश्रृंगी पोलीसांनी अटक करून त्याचेकडून एकूण १० चोरीच्या मोटर सायकल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत त्याचेकडून वाहनचोरीचे ०८ गुन्हे चतुःश्रृंगी पोलीसाांनी उघडकीस आणले आहे ०६ गुन्हे , विश्रामबाग व अलंकार पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी ०१ गुन्हा असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत . सदर गुन्हयामध्ये एकूण ५ लाख रूपयेच्या ८ स्प्लेंडर मोटर सायकल , १ युनिकॉन मो.सा.एक अॅक्टीव्हा हस्तगत करण्यात आला आहे. व पुढील तपास उप निरीक्षण मोहनदास जाधव हे अधिक तपास करीत आहेत .