पुणे दि ०१ :- “वसुंधरा”अभियाना अंतर्गत हरित शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न १ जानेवारी २०२१ रोजी”माझी वसुंधरा “अभियाना अंतर्गत पुणे महानगरपालिका प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्याजवळ महापालिकेच्या वतीने शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला प्र . नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी शपथ घेतली . त्यापाठोपाठ उपस्थित
अधिकारी , कर्मचारी यांनी शपथ घेतली . निसर्गाशी संबंधित पंच तत्वांवर ‘ ‘ माझी वसुंधरा ‘ ” अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणेसाठी व प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करुन सभोवतालच्या पर्यावरणाला हरित करणे , पर्यावरणाला सोबत घेऊन विकास केला पाहिजे , प्रत्येक व्यक्तीने रोजच्या दिवशी पर्यावरणाला जपून , पर्यावरणाची काळजी घेऊन प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे , त्यामुळे आज १ जानेवारी २०२१ वर्षाच्या नवीन दिवसाच्या सुरुवातीला सगळ्यांनी एक नवीन सुरुवात करुन हॅपी न्यू इयर करुन पर्यावरणाची शपथ घेतली पाहिजे असे मनोगत . महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केले . ” माझी वसुंधरा ‘ ‘ अभियान दि . १ जानेवारी २०२१ ते दि . १५ जानेवारी २०२१ या कालावधीत आयोजित केलेला असून प्रत्येक नागरिकाने , शाळा , स्वयंसेवी संस्था , महाविद्यालये यांनी कोरोना संबंधित प्रोटोकॉल विचारात घेऊन छोट्या ग्रुपने , वैयक्तिकरित्या , तसेच ऑनलाईन पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने ” हरित शपथ ” घ्यावयाची आहे . याप्रसंगी . महापालिका आयुक्त विक्रम कुमार , अतिरिक्त महापालिका आयुक्त ( ज ) रुबल अग्रवाल , उप आयुक्त सुनिल इंदलकर , प्र . सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे तसेच अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .