पिंपरी चिंचवड दि १४: – प्रेयसीची हौस पुरविण्यासाठी त्यांनी ठराविक कालावधीनंतर मोबाईल फोन बदलून द्यायचा. तिच्याकडून अगोदरच मोबाईल फोन घेऊन तो विकायचा, असा दोन चोरट्यांना पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी आसा 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत.सागर मोहन सावळे (वय 22, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), निलेश देवानंद भालेराव (वय 19, रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, भोसरी पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाच्या खाली दोघेजण
दुचाकीवरून (एम एच 14 / एच बी 3909) येणार आहेत.
ते दोघेजण पायी चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावतात. या माहितीनुसार, पोलिसांनी पीएमटी बस स्टॉपजवळ सहा तास सापळा लावून आरोपी सागर आणि निलेश यांना ताब्यात घेतले.त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आठ मोबाईल फोन आणि एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यात पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी असा एकूण 4 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.आरोपी सागर आणि निलेश यांच्या प्रेयसी असलेल्या तरुणींना स्मार्टफोनचे आकर्षण होते. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ठराविक दिवसांच्या अंतराने दोघेही प्रेयसींना वेगळा मोबाईल फोन वापरण्यासाठी देत असत. प्रेयसीकडे पहिला मोबाईल फोन द्यायचा आणि दुसरा मोबाईल फोन चोरायचा. त्यानंतर चोरलेला दुसरा मोबाईल फोन प्रेयसीला वापरायला द्यायचा आणि तिच्याकडून पहिला मोबाईल काढून घ्यायचा. काढून घेतलेला पहिला मोबाईल फोन विकायचा आणि त्यातून आलेल्या पैशांवर मौजमजा करायची. असा सपाटा या दोघांनी मागील काही महिन्यांपासून लावला होता. त्यांनी तब्बल 26 स्मार्टफोन तसेच तीन दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , रोडने पायी मोबाईल फोनवर बोलतना सावधगीरी बाळगावी व आपल्या मागे पुढे लक्ष दयावे . ज्या इसमांचे अगर महिलांचे मोबाईल फोन दुचाकी वरून येवुन , हिस्कावुन नेलेले आहेत . अशा नागरीकांनी दरोडा विरोधी पथक , गुन्हे शाखा , पिंपरी चिंचवड कासारवाडी कार्यालय , भोसरी , पुणे येथे मो.क्र . ८८०५३३३०३३ यावर संपर्क साधावा . व येताना आपले मोबाईलची पावती अगर मोबाईल खरेदी केल्याचा बॉक्स घेवुन यावे . सदरची कारवाई पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त.रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त . सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे , यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे , तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे , राजेंद्र शिंदे , उमेश पुलगम , राहुल खारगे , विक्रांत गायकवाड , नितीन लोखंडे , आशिष बनकर , सागर शेडगे , प्रविण माने , राजेश कौशल्य व गणेश कोकणे यांचे पथकाने केली आहे .