पुणे दि २३ : -पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने आज दि २३ रोजी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शिवाजीनगर मुख्यालय पोलीस हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबाराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले.यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील रक्तदान केले.पोलीस मुख्यालयात पोलीस रुग्णालयात हा रक्तदान शिबीर आज रोजी संपन्न झाला आहे. आज उद्घाटन झाले.व ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान यंदा पार पडत आहे.सात दिवस विविध कार्यक्रम यानिमित्ताने शहर वाहतूक विभागाकडून घेतले जात आहेत. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह वाहतूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.