मुंबई दि २६ : मुबंई-परिवहन विभागाचे डी वाय आरटीओ संजय ससाणे यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पिक्सलस्टेट यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली.
ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.
प्रथम पारितोषिक रु.३१०००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय पारितोषिक रु.२१०००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
त्रुतीय पारितोषिक रु.११०००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तसेच वैयक्तिक बेस्ट आऊटगोईंग फिल्म,बेस्ट डायरेक्टर,
बेस्ट मेसेज फिल्म,बेस्ट ज्यूरी अवॉर्ड,बेस्ट अँक्टर,बेस्ट अँक्ट्रेस,
बेस्ट चाईल्ड अँक्टर,बेस्ट रायटर,बेस्ट एडिटर,बेस्ट डिओपी,
अशीही रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
याशिवाय चांगला मेसेज, चांगली फिल्म, टँग लाईन यांचे प्रदर्शनही आरटीओ मार्फत करण्यात येईल.
फिल्म जमा करण्याची शेवटची तारीख आहे *१६ फेब्रुवारी २०२१ स्पर्धेच्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या सांकेतिक स्थळावर भेट द्यावी.
http://maharoadsafety.com/filmfestival2021/
मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पिक्सलस्टँट चे महेश मोटकर यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.