पुणे दि २६ : -पुणे रेल्वे विभागातील सर्व स्टेशन, डेपो व विविध कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम पुण्यातील ताडीवाला रोड येथील रेल्वे मैदानावर झाला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकविला. त्यांनी रेल्वे सुरक्षा बल, सिव्हिल डिफेन्स, सेंट जॉन एम्ब्युलन्स, स्काऊट आणि गाईड पथकाच्या
संयुक्त परेडची पाहणी केली. या प्रसंगी डॉग स्कॉडने एक आकर्षक प्रस्तुती सादर केली. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले . यामध्ये मुलांनी सुंदर नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीलम चंद्रा, सहर्ष बाजपेयी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी डॉ.तुशाबा शिंदे, विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी केले. व महिला समाज सेवा संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा रेल्वे रूग्णालयात रूग्णांना फळे व भेटवस्तू दिल्या.या वेळी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय आठवले यांच्यासह इतर महिला संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.