पुणे दि २६ :- वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल अशा आश्वासनांची पूर्तता न केल्याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दि २६ रोजी पर्वती विधानसभा मतदार संघ च्या वतीने यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने सहकारनगर पोलिस स्टेशन व बिबवेवाडी पोलिस ठाण्यात केली. वाढीव वीज बिलाबाबत याआधीही मनसेने आंदोलन केले होते आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेत मनसे आक्रमक झाली आहे.
मनसेचे माहीम पर्वती विधानसभा मतदार संघ च्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस स्टेशन बिबवेवाडी पोलिस ठाण्यात भेट देत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले. कोरोंना महामारीच्या दिवसांत टाळेबंदी असताना महावितरणाकडून वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले नाही या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अतिरिक्त जादा बिल पाठविण्यात आले होते.
लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रारी मांडल्या होत्या तसेच बैठकी देखील घेण्यात आल्या या बैठकीत वीज बिलात कपात करून नगरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देण्यात आले होते व सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केले वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूक केली यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.व निवेदन देण्यात आले यावेळी विक्रांत अमराळे, गणेश नाईकवाडे, संतोष चव्हाण,संतोष वरे,आशिष वाघमारे, गणेश वाघचौडे,निलेश वेल्हाळ,कृष्णा ताजवेकर,रवी शिर्के व मनसे पदाधिकारी उपस्थित होते