पिंपरी चिंचवड दि २७ : – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संकल्पनेतून दृष्टीहीन असलेल्या रीना पाटील यांना एक दिवसाच्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला तर ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. या दोघींना दिलेल्या विशेष सन्मानाने त्या भारावून गेल्या होत्या.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रीना पाटील यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांना सॅल्युट केला. तसेच पतीचं निधन झाल्यानंतर जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या ज्योती माने यांना अप्पर पोलीस
आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सल्युट केला. एक दिवसासाठी का होईना या सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा मान मिळाल्याने या दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी दृष्टीहीन महिला तर अप्पर पोलीस आयुक्त पदी एकलमाता आणि पोलीस उपायुक्त पदी सर्व सामान्य लोकवस्तीतील विद्यार्थी विराजमान अनोख्या पध्दतीने साजरा केला गेला प्रजासत्ताक दिन ” पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश यांना कणखर अधिकारी म्हणुन ओळखलं जात . मात्र आज त्यांच्यातील संवेदनशीलताही पिंपरी चिंचवडकरांना अनुभवायला मिळाली . आज ७२ व्या प्रजासत्ताक | दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पदाचा कार्यभार चक्क एका अंध महिलेच्या हाती सोपवला तर अप्पर पोलीस आयुक्त पदाची सुत्रे एका एकलमातेला आणि पोलीस उप आयुक्त पदाचा पदभार एका गरीब लोकवस्तीतील सुशिक्षित विद्यार्थ्याला बहाल करत सर्वांना आनंदाचा धक्का दिला . दिनांक २६/०१/२०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास हा सोहळा पार पडला त्यावेळी पोलीस
आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले . तेंव्हा स्वतः पोलीस आयुक्त . कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच पोलीस दलातील पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला . त्यानंतर तिघेही कार्यालयात दाखल झाले . त्यावेळी त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानी विराजमान करीत मानवंदना देऊन दैनंदिन कार्याला सुरुवात केली . हा सगळा प्रकार उपस्थितांसाठी भाराऊन टाकणारा होता . मात्र एक दिवसासाठी पोलीस आयुक्त पदाचा आणि इतर पदभार स्विकारणाऱ्या तिघांसाठीही हा क्षण अभिमानाचा होता . विशेष अतिथी दृष्टीहीन रीना पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . ” या क्षणाचा स्वपन्नातही विचार केला नव्हता , आम्ही पुर्णतः अंध असल्याने फक्त पोलीसांबद्दल ऐकू शकतो . मात्र जे ऐकल ते खरं निघालं पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात . मी दिल्लीला गेले होते तेंव्हा घरच्यांनी सांगितले होते आधी पोलीसांना भेट ते तुला व्यवस्थित मार्गदर्शन करतील . आणि योग्य पत्त्यावर सोडतील . तसचं झाल कुठलीही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात . हे त्यांच मोठेपण , आज मी पोलीस आयुक्त या पदाची एक दिवसाची सुत्रे स्विकारल्यावर एक नक्की सांगावस वाटते की , कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजेत तरच महिला सुरक्षित राहतील . ज्योती माने : एकलमाता यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ” पतीच निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला अनेकवेळा हताश झाले . मुलीचा सांभाळही करायचा होता . अशा परिस्थितीत फक्त पोलीसांनी जगण्याचे बळ वाढवल .आज जेंव्हा हा सन्मान स्विकारला त्याचा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिनेही पोलीसांची मदत घ्यावी ते आपल्यासाठीच असतात . ” दिव्यांशु तामचिकर : सर्वसामान्य लोकवस्तीतील सुशिक्षित विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . मी अजुन लहान आहे पण जिथे माझं १० वी पर्यंतच शिक्षण पुर्ण झालं त्या वस्तीत आजूबाजूला चुकीच्या माणसिकतेची लोकं होती मी अभ्यास करुन चांगल्या मार्कानी पास झालो . आता महाविद्यालयात जाईल आज इथे खोटा पोलीस म्हणुन दाखल झालो असलो तरी भविष्यात खूप मेहनत करुन मी खराखुरा पोलीस अधिकारी म्हणुनच पोलीस मुख्यालयात दाखल होणार . मला आपल्या समाजाची मानसिकता बदलायची आहे . ” पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे. पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या सामाजातील प्रत्येक घटकास न्याय हक्काची जाणीव व्हावी व सशक्त देशाचे नागरीक म्हणुन प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन योगदान द्यावे . कायदे आणि व्यवस्थेपेक्षा संविधान मानणाऱ्या नागरिकांमुळे कुठलाही देश चालतो , प्रगती करतो . आज आपल्या देशातील लोकशाहीचा गर्व वाटतो . संविधानाने आम्हाला लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता शासन चालविण्याचे उद्दिष्ट दिले . त्याची प्रचिती प्रत्येक प्रजासत्ताक दिनी येतेच . मात्र आज हा सोहळा बघताना आम्ही आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी उभे आहोत , त्यांनाही आमच काम कळलं पाहिजेत आणि त्यांनाही आमच्या प्रति संवेदनशिलता दाखवली पाहिजे . त्याच बरोबर समाजातील सर्व घटका बरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्याचा ठरवलं ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . . . गायल . अप्पर पोलीस आयुक्त . रामनाथ पोकळे , यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . सर्व नागरीकांनी दक्ष राहुन पोलीसांना सहकार्य केल्यास निश्चितपणे गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच महिला , मुली व विद्यार्थीनी यांनी त्यांच्यासोबत मोठ्या घटनांची त्किाळ
पोलीसांची मदत घेतल्यास पुढे घडणारा अनर्थ टाळण्यास मदत होईल . तसेच महिलांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल शांत न बसता त्याचे विरुध्द आवाज उठविला पाहिजे . ‘ असे सांगुन पोलीस विभागातील दैनंदिन कामाकाजाची माहिती करुन दिली . पोलीस उप आयुक्त . सुधीर हिरेमठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ज्या विद्यार्थ्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या खुर्चीचा पदभार स्विकारला त्यांना मी फक्त एकच गोष्ट सांगतो , ती म्हणजे प्रामाणिकपणे , जिद्द आणि मेहनतीने जे मिळवता येते तेच चिरकाल टिकते आणि आपल्या प्रत्येक अडीअडचणीतून यशस्वी मार्ग काढता येतो . तुम्हा सर्वांच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे . दिव्यांशु नक्कीच शिकणार गरीब लोकवस्तीतील मुलं केवळ गुन्हेगारीकडेच वळतात हा केवळ गैरसमज आहे . आपण समाज म्हणुन अशा परिसरातील होतकरु तरुणांना , विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन भविष्य उज्वल करायला हवं . . सदर कार्यक्रमास.पोलीस आयुक्त . कृष्ण प्रकाश यांचेसह . अप्पर पोलीस आयुक्त. रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , ( गुन्हे ). सुधीर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे -२ श्रीमती प्रेरणा कट्टे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक . विठ्ठल कुबडे , विशेष अतिथी दृष्टीहीन रीना पाटील , एकलमाता ज्योती माने व विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर व इतर नागरीक उपस्थित होते .