पुणे दि २७ :- चतुर्श्रुंगी पो.स्टे . परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारावर चतुःश्रृंगी पो.स्टे . हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम नामे- गौरव संभाजी काकडे वय -२८ वर्ष रा.सोमेश्वरवाडी विठ्ठल मंदिरा शेजारी पाषाण पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे . त्याने त्यांच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता , चाकू , तलवार , यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन जबरी दुखापत , या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते व . त्याची गुन्हेगारी कृत्ये मागील ०२ वर्षामध्ये . त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत त्याचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसलेचे पोलिसांना दिसून आले होते व त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेला होता . तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते . वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,अनिल शेवाळे , चतुर्श्रुंगी पो . स्टे . पुणे शहर . यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचेकडे सादर केला होता.व अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे
विरुध्द दिनांक २६/०१/२०२१ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले असून त्यास दि .२७ / ०१ / २०२१ रोजी सदर आदेशानुसार स्थानबध्द करुन येरवडा कारागृह , पुणे . येथे ठेवण्यात आले आहे.पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे . त्यानुसार मागील वर्षामध्ये ११ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले असून चालु वर्षात सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करुन अशा प्रकारच्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यांचे चतुर्श्रुंगी पोलिसांनी ठरविले आहे ..