अलिबाग दि २७ :- नवोदीत कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार आणि द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स तर्फे आयोजित पहिल्या अलिबाग लघुपट महोत्सवात विख्यात श्रीवास्तव दिग्दर्शित ‘मुस्कान’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर ‘लव्ह नोज ना जेंडर’ या लघुपटासाठी शिवांकर अरोरा यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक पटकाविले. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या प्रसंगी दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले कि चित्रपट महोत्सव हि संकल्पा नवोदित दिग्दर्शक कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी मोठा प्लाटफोर्म आहे. या ठिकाणी नवीन कलागुणांना वाव मिळतो. त्याचं कौतुक होत. त्याच बरोबर जगभरातील विविध लघुपट पाहायला मिळतात. या माध्यमातून फिल्ममेकर यांना हक्काचं व्यासपीठ मिळत आहे. प्रत्येक शहरात असे महोत्सव भरवणे काळाची गरज आहे. त्याच बरोबर समाज्याला योग्य दिशा देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हावी असे रामकुमार शेडगे म्हणाले.
‘लव्ह नोज नो जेंडर’ या लघुपटाच्या पटकथेसाठी शिप्रा अरोरा यांनी पारीतोषिक मिळविले. सर्वोत्कृष्ट जाहीरात लघुपटाच्या पारितोषिकासाठी माझ काजमी यांच्या ‘बटर चिकन ग्रेव्ही’ या लघुपटाची निवड करण्यात आली, तर सर्वोत्कृष्ट संकल्पना आणि संकलनाचे पारितोषिक बंगलोर येथील प्रितेश भंडारी यांच्या ‘फिश प्रâाय’ या लघुपटाने मिळविले. मितेश टाके यांच्या ‘दुर्गाज लॉकडाऊन’ला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लघुपटासाठी गौरविण्यात आले. अभिनव निकम यांच्या ‘परस्युट ऑफ पॉकेट स्क्वेअर’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट नॅरेटिव्ह लघुपटाचे पारितोषिक मिळविले. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनच्या तहानफीज काद्री यांचा ‘हेडलाईन’ लघुपट सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट ठरला.
भारतासह युरोप आणि अमेरिकेतील विविध देशातून शंभरहून अधिक लघुपटांची महोत्सवातील स्पर्धा विभागासाठी निवड करण्यात आले. त्यामधील अकरा सर्वोत्कृष्ट लघुपटांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.