श्रीगोंदा दि २७ :- कोरोनाच्या महामारी मुळे देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात दिनांक २२ मार्च २०२० ते आठ जून 2020 दरम्यान अति कठोर टाळेबंदी होती.या काळात महावितरण’कडून ना वीज मीटर रीडिंग साठी प्रतिनिधी पाठवण्यात आले ना वीज देयक वितरित करण्यात आले. घरातच बंदिस्त असलेल्या जनतेला या कालावधीत महावितरण कंपनीकडून अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी व भरमसाठ बिले पाठवली गेली. कोरोनामुळे अनेक नागरिकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तसेच अनेक व्यवसायीकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागला. या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर राजकीय पक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे विज बिल कमी करण्याबाबत वारंवार मागण्या केल्या होत्या. मंत्र्यांनी वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकर घेऊन नागरिकांना दिलासा देवु असे आश्वासन दिले होते. परंतु पुढील काळात प्रत्येक” वीज ग्राहकाला वीजबिल भरावाच लागेल असे फर्मान काढले’.मंत्र्यांनी नागरिकांचा विश्वास घात व फसवणूक करणारे वक्तव्य केले.20 जानेवारी 2021 ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यास महावितरण’ने नकार दिला आणि थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले. वीज बिलामध्ये दिलासा देण्याचे खोटे आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोंमहिने झुलवत ठेवणे आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन वीज बिलांची रक्कम वसूल करणे ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाहीतर वीज कंपनीशी संगणमत करून करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे. यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभीत झाली असून प्रचंड मानसिक आघात पोहोचलेला आहे याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्याविरुद्ध फसवणूक व मानसिक आघात पोहोचण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीगोंद्याच्या वतीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके ,मनसे तालुकाध्यक्ष अमोल कोहक, सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील दळवी मेजर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अतुल कोठारे, सहकार सेना तालुका अध्यक्ष हेमंत लोखंडे, मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश पाचपुते, मनसेचे कार्यकर्ते प्रवीण होले, प्रदीप घाटे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सागर दिवटे, प्रदीप घाटे सह आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे