श्रीगोंदा दि २८ :- श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा पूर्ण झाला असुन सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आज स्पष्ट झालेलं आहे.याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारनं सरपंचपदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.
श्रीगोंदा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली.ती छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील जिमखाना सभागृहात याबाबत सुधाकर भोसले प्रांताधिकारी, प्रदीप पवार तहसीलदार,रामराव ढिकले पोलिस निरीक्षक,चारुशीला पवार मॅडम तसेच प्रशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत जाहीर करण्यात आली होती.यावेळी लहान मुलांच्या हस्ते सरपंचपद आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढून,आरक्षण जाहीर करण्यात आले.
सरपंचपदाची आरक्षण सोडत खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे:- भावडी (अनुसूचित जाती), महाडुळवाडी अनुसूचित जाती स्त्री), घोगरगाव (अनुसूचित जाती स्त्री), सुरोडी (अनुसूचित जाती स्त्री), घुगलवडगाव (अनुसूचित जाती), म्हसे (अनुसुचित जाती स्त्री), सुरेगाव (अनुसुचित जाती स्त्री), बाबुर्डी (अनुसूचित जाती), गव्हाणेवाडी (अनुसूचित जात, घोडेगाव (अनुसूचित जाती स्त्री) कौठा (अनुसूचित जाती), बोरी (अनुसूचित जाती), आर्वी (अनुसूचित जमाती स्त्री), कोकणगाव (अनुसूचित जमाती), माठ (अनुसूचित जमाती), घोटवी (अनुसूचित जमाती), वडाळी (अनुसूचित जमाती स्त्री), राजापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), कोळगाव (नागरीकांचा मागास प्रवर्ग), पिंपळगाव पिसा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), अजनुज (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), येळपणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), उक्कडगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), चांभुर्डी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), उखलगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), घारगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), मांडवगण (नागरिकांचा मागास प्रवर्ग) तरडगव्हाण (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), रुईखेल (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), टाकळी लोणार (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), कोसेगव्हाण (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), चिखलठाण वाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग), काष्टी (नागरीकांचा मागास प्रवर्ग), हिंगणी दुमाला (नागरीकांचा मागास प्रवर्ग), विसापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), हंगेवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), घुटेवाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग), सारोळा सोमवंशी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), बनपिंपरी (नागरीकांचा मागास प्रवर्ग), अधोरेवाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग), पिंपरी कोलंदर (सर्वसाधारण स्त्री), रायगव्हाण (सर्वसाधारण), ढवळगाव (सर्वसाधारण),देवदैठण (सर्वसाधारण स्त्री), येवती (सर्वसाधारण स्त्री), अरणगाव दुमाला (सर्वसाधारण), कोंडेगव्हाण (सर्वसाधारण), एरंडोली (सर्वसाधारण), निंबवी (सर्वसाधारण), कोरेगव्हाण (सर्वसाधारण स्त्री), चिखली (सर्वसाधारण), कोरेगाव (सर्वसाधारण) मुंगूसगाव (सर्वसाधारण स्त्री), कोथुळ (सर्वसाधारण), पारगाव सुद्रिक (सर्वसाधारण स्त्री), चवरसांगवी (सर्वसाधारण स्त्री), थिटे सांगवी (सर्वसाधारण), कामठी (सर्वसाधारण) बांगर्डे (सर्वसाधारण स्त्री), भानगाव (सर्वसाधारण स्त्री), ढोरजा (सर्वसाधारण स्त्री), देऊळगाव (सर्वसाधारण), पिसोरेखांड (सर्वसाधारण), खांडगाव (सर्वसाधारण स्त्री) तांदळी दुमाला (सर्वसाधारण), आढळगाव (सर्वसाधारण), हिरडगाव (सर्वसाधारण स्त्री), बेलवंडी कोठार (सर्वसाधारण स्त्री), चांडगाव (सर्वसाधारण), पेडगाव (सर्वसाधारण) टाकळी कडेवळीत (सर्वसाधारण स्त्री), शेडगाव (सर्वसाधारण स्त्री), वेळु (सर्वसाधारण स्त्री), चोराचीवाडी (सर्वसाधारण), आनंदवाडी (सर्वसाधारण स्त्री), बेलवंडी (सर्वसाधारण), लोणी व्यंकनाथ (सर्वसाधारण स्त्री) चिंभळे (सर्वसाधारण स्त्री), वांगदरी (सर्वसाधारण), मढेवडगाव (सर्वसाधारण), शिरसगाव बोडखा (सर्वसाधारण स्त्री), लिंपणगाव (सर्वसाधारण स्त्री),म्हातार पिंपरी (सर्वसाधारण स्त्री), सांगवी दुमाला (सर्वसाधारण), निमगाव खलू (सर्वसाधारण) व गार (सर्वसाधारण स्त्री) अशा पद्धतीने सरपंचपद आरक्षण सोडत झाली आहे.सरपंच पदाच्या सोडतीच्यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,विविध ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच,सदस्य आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे