पुणे दि ३० :- दत्तवाडी पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून स्कॉपीओसह ४ दुचाकी चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. १ ) राजु ऊर्फ गुडया मधुकर पवार वय १ ९ वर्षे , रा . ढोक बाबुळगाव , ता . मोहोळ , जि . सोलापुर , २ ) महमद ऊर्फ म्हमद्या अन्वर शेख , वय . १ ९ वर्षे , रा . ढोक बाबुळगाव , ता . मोहोळ , जि . सोलापुर अशीअसे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील कर्मचारी गस्त घालत असताना दि .२९ /०१/ २०२१ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणे तपास पथक व बीट मार्शल असे एल्गार परिषदेच्या पुर्वसंध्येच्या बंदोबस्ताचे अनुषांगाने पेट्रोलिंग करीत असताना निलायम ब्रीज जनता वसाहत कॉर्नर गदादे पाटील यांचे ऑफिसजवळ , पर्वती पुणे येथे दोन इसम हिरो होंडा स्पेल्डर गाडी घेवुन कॅनोल रोडला संशयास्परित्या दुचाकीवरुन जाताना ताब्यात घेण्यात आले.त्याच्या दुचाकीच्या त्यांचेकडे असणारी हिरो होन्डा स्पेल्डरचे मुळ कागदपत्र व लायसनबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिशी खाक्या दाखवताच त्याने, सदरची गाडी ही म्हात्रे पुलाजवळ , पुणे येथुन तीन दिवसांपुर्वी चोरुन आणलेली आहे . त्याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल असल्याने त्यांना दाखल गुन्हयांत अटक करुन दत्तवाडी पोलीसांनी त्यांचेकडे कौशल्यपुर्णरित्या तपास करुन त्यांनी ( १ ) भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर कात्रज येथुन चोरलेली एक स्कॉर्पओ गाडी ( २ ) राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण वेळु येथुन चोरलेली प्लॅटिना दुचाकी , ( ३ ) वाकड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड थेरगाव येथुन चोरलेली एक शाईन मोटार सायकल व ( ४ ) पंढरपुर तालुका पोलीस ठाणे सोलापुर येथील गोपाळपुर येथुन चोरलेली एक युनिकॉर्न मोटार सायकल असा एकुण १० लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . यातील अटक आरोपी हे मुळचे सोलापुर येथील असुन त्यांचेवर यापुर्वी वाहन चोरी , घरफोडीचे गुन्हे हडपसर , माळशीरस व पंढरपुर भागात गुन्हे दाखल आहेत . अटक आरोपी हे डुब्लीकेट चावीचा वापर करुन गाडयांची चोरी करत असल्याचे निष्पण झाले आहे . दाखल गुन्हयांचा पुढील तपास कुंदन शिंदे पोलीस हवालदार हे करीत आहेत . सदरची कारवाई ही . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग , संजय शिंदे , पोलीस उप – आयुक्त सो परि . ३ . पौर्णिमा गायकवाड , सहा . पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पोमाजी राठोड , वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप – निरीक्षक स्वप्नील लोहार , पो . हवा . कुंदन शिंदे , सुधीर घोटकुले , राजु जाधव , नरेश बलसाने , पो . अं . महेश गाढवे , सतिश भारती , विशाल ठोबंरे , अक्षयकुमार वाबळे , विष्णु सुतार , राहुल ओलेकर , अमित सुर्वे , शरद राऊत , नवनाथ भोसले , शिवाजी क्षीरसागर , प्रमोद भोसले , सागर सुतकर यांनी केली आहे .