स्क्रीप्ट दि ०२ :- महागांव तहसील कार्यालयात तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी नामदेव इसाळकर यांनी आज सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत केली असून यावेळी महागांव तालुक्यातील नव्याने निवडून आलेले शेकडो ग्रा.प. सदस्यासह अन्य नागरिक ही उपस्थित होते. महागांव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जातीचे ११,अनुसुचित जमातीचे १२ वगळता ५३ ग्राम पंचायती मधून २१ ग्राम पंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदाची सोडत ही ईश्वर चिठ्ठी व्दारे करण्यात आली होती तर३२ग्रा.प.चे सरपंच पद हे सर्वसाधारण करिता सोडण्यात आले आहे.काही ग्राम पंचायत मध्ये नामाप्रचा सदस्यच निवडून आले नाही व त्या ग्रा.प.चे सरपंच पद हे नामाप्रसाठी सुटल्याने काही ठिकाणच्या नवनिर्वाचित सदस्यांची तारांबर उडाली असता तहसिलदार नामदेव इसाळकर यांनी चर्चेच्या माध्यमातून समाधान केले आहे.
यवतमाळ प्रतिनिधी :-मायाताई सागर पाईकराव