पुणे दि ०३ : – कॅस्ट्रॉल कंपनीचे नावाने ऑइलची भेसळ करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्यास चतुर्श्रुंगी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्याच्याकडून ३२ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बालाजी अॅटोमोबाईल्स शॉप नं .१ , लक्ष्मण पार्क , ग्रिनपार्क हॉटेलचे समोर , बाणेर रोड पुणे
(बुधवारी, दि.०३) रोजी करण्यात आली.नामे मुकेश गोपाळ अगरवाल वय २ ९ वर्षे रा . फ्लॅट नं .१०२ , सिल्व्हन हाईटस , बाणेर कमानीजवळ , बाणेर पुणे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि,शॉप नं .१ , लक्ष्मण पार्क , ग्रिनपार्क हॉटेलचे समोर , बाणेर रोड पुणे कॅस्ट्रॉल कंपनीचे नावाने ऑइलची भेसळ करून करून ज्यादा दराने विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी दुकानांमध्ये छापा मारून कॅस्ट्रॉल कंपनीचे नावाने भेसळऑइलचे डबे व अगरवाल याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३२ हजार ७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. व कॅस्ट्रॉल कंपनीचे बनावट लेबल लावून ऑईल कॉपीराईट अधिकाराचे उल्लंघन करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता स्वत : जवळ बाळगून विक्री करीता ठेवलेले असताना मिळून आला आहे म्हणून कॉपीराईट अॅक्ट सन १९५७ चे कलम ६३,६५ अन्वये होत असल्याने कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक गुन्हे , दादा गायकवाड , सहा.पोलीस निरीक्षक.महेश भोसले, पीएसआय बालाजी माळी,व चतुःश्रृंगी पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली आहे