पुणे दि ०४ – पुणे कोथरुड परिसरात विजयालक्ष्मी अपार्टमेंट रामबाग काॅलनी शिवराय प्रतिष्ठान काॅलेजच्या समोर राहणा-या भाविका विलास झोरे ( वय ३४ ) ही सारसच्या छळाला कंटाळून ३ फेब्रुवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी फिनेल प्यायली म्हणून तीला पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला तीच्या मृत्यने कोथरूड परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर ही आत्महत्या नसून पतीने ठरवून घडवलेली हत्या असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून करण्यात आला आहे भाविकाच्या मृत्यूनंतर तीची आई शांती पिंगळे यांनी भाविकाचे पती विलास तुकाराम झोरे यांच्या विरोधात कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली
आहे.कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार भाविका हिचा १२ डिसेंबर २०१० रोजी विलास तुकाराम झोरे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह करण्यात आला होता भाविका ही मुळची नायरी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथील आहे तिच्या लग्नानंतर ती पुण्यात आली लग्नानंतर फक्त सहा महीने तीचा संसार सुखी चालला आणि मग पती – पत्नीच्या संसाराला ग्रहन लागत गेले. भाविका आणि विलास यांना तीन मुले आहेत भाविकाच्या आईने तक्रारी दिलेल्या माहितीनुसार २०११ पासून भाविका हिचा कायम छळ होत होता तीचा वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता छळाबाबत भाविका हिने आईला फोनवरुन सांगितले होते मात्र तीने या छळाबाबत घरच्या इतरांना न सांगण्याची अट घातल्याने आईने तीच्या भावांना याबद्दल काही सांगीतले नव्हते . भाविका हिचा पती सुधारेल आणि त्यांचा संसार सुखाचा होईल या आशेवर तीची आई होती मात्र भाविकाच्या छळात वाढच होत गेली. भाविकाला जेवण जमत नाही , काही काम नको असे वारंवार हिणवले जात असल्याचे आईने सांगितले आहे. भाविका वर्षातून एकदा दिवाळी सणात माहेरी येत असे ती माहेरी आली म्हणून ही तिचा छळ केल्याचे आई म्हणाली. १९ डिसेंबर २०२० ला भाविका मयुरी हिच्या लग्नासाठी देवरुख रत्नागिरी येथे आली होती त्या दरम्यान ही तीचा छळ झाला मुलांचे कारण देत पतीकडून शिवीगाळ करण्यात आली होती मी आताच लग्न सोडून पुण्याला निघून जातो अशी धमकी दिली होती मात्र माहेरच्या मंडळींनी समजूत घालत प्रकरण शांत केले होते. मात्र ही शांतता फार काळ टिकू शकली नाही खुप दिवसांच्या छळवणूकीनंतर अखेर भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला भाविकावर कोथरुड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत भाविकाच्या मृत्यूप्रकरणी तीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोथरुड पोलिस ठाण्यात पोलिसांनी भां.दं.वि ३०६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वृषाली पाटील अधिक तपास करत आहेत.