पिंपरी-चिंचवड दि ०३ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकामावर अतिक्रमणची धडक कारवाई सुरु केली आहे. चिखली, जाधववाडीतील अतिक्रमणावर आज दि ३रोजी सकाळपासून कारवाई केली आहे.व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली . सदर कारवाईमध्ये कुदळवाडी मधील गट न . २५६,२५७,२५८,२५९ येथील सोबत जोडलेल्या यादीनुसार एकूण ६८ अनधिकृत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १,४६,००० चौ.फुट पाडण्यात आली आहेत . सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त ( २ ) अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , उपायुक्त.मनोज लोणकर सहशहर अभियंता. मकरंद निकम यांच्या उपस्थितीत तसेच. कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी.राजेंद्र राणे यांचे नियंत्रणाखाली उप.अभियंता , सुर्यकांत मोहिते , हेमंत देसाई , सुधीर मोरे , तसेच ५ कनिष्ठ अभियंता व एकूण ४८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच पोलीस विभागामार्फत डी.सी.पी.सुधीर हिरेमठ व.आनंद भोईटे . सहायक आयुक्त.संजय नाईक पाटील ,
पी.आय.सतिष माने ,दिलीप भोसले ,.शहाजी पवार , १० पी.एस.आय. व १०५ पोलीस कर्मचारी व ३० एस.आर.पी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली . सदर कारवाईसाठी २ पोकलेन , ७ जेसीबी , २ क्रेन व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते . सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात यापुढेही ठीकठिकाणी झालेल्या व्यापारी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात येणार असून सदर पत्राशेड धारकांना पत्राशेड काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे . उर्वरित कारवाई गुरुवार दि . ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी सुद्धा चालू राहिल .महापालिकेने अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरु केली आहे. लॉकडाऊननंतरची आजची मोठी कारवाई आहे.