श्रीगोंदा दि.२७ :-श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ बस स्थानकासमोर उसाचा टॅक्टर ट्रॉली व दुधाचा टँकर यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. ही धडक इतकी जोराची होती की,टँकरची एक बाजु पूर्णपणे आत गेली होती.हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास नगर-दौड रोडवर लोणी व्यंकनाथ येथे घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव बाळासाहेब बबनराव यादव (वय ६०, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) असे आहे. एम.एच.४२ए.क्यू.५६१४ या क्रमांकाचा दुधाचा टँकर बारामतीवरून नाशिकला दूध भरण्यासाठी जात होता. यावेळी लोणी बस स्थानकाजवळून नागवडे साखर कारखान्याकडे जाणा-या उसाच्या टेलरची व टँकरची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले होते त्यांना लोणीव्यंकनाथ येथील युवकांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने दवाखान्यात पाठविले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी मृत्यू पावले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे