पुणे दि २७ : -पाषाण येथील सुसखिंड , पाषाण टेकडी , सुस रोडवरील एका तरुणाच्या वार करुन व दगडाने ठेचून त्याचा खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी यांचा चुलत भाऊ संधीप पंडीत , वय ३४ वर्षे , रा . सुतारवाडी , पाषाण यांनी फिर्याद दिली आहे. दि २७/०२/२०२१ रोजी सकाळी ०८.३० वा . चे पुर्वी सुसखिंड , पाषाण टेकडी , पाषाण , पुणे येथे मयत इसम नामे सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबुराव पंडीत , वय ३० वर्षे , रा . लक्ष्मीधाम सोसायटी पाठीमागे , शिवनगर , सुतारवाडी , पाषाण , पुणे मुळ मु . पो . जानेफळ ( पंडीत ) ता . जाफराबाद जि . जालना यास वर नमुद केले ता . वेळी व ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने , कोणत्यातरी कारणावरून प्राणघातक हत्याराच्या सहाय्याने गंभीर जखमा करून , जिवे ठार मारले आहे . तसेच मयताची ओळख पटू नये याकरीता त्याचे अंगावरील कपडे काढून चेहरा दगडाने ठेचला आहे .
यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्याजवळील सर्व वस्तू काढून घेऊन ते खुन करून पळून गेले. आहे व पो.निरी . ( गुन्हे ) गायकवाड , अधिक तपास करीत आहे.