श्रीगोंदा दि २८ :-:-नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांव येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्वीफ्ट कार मधील एक व रिक्षा चालक गंभीर जखमी झाले.या गंभीर जखमी झालेल्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर जखमी अल्पवयीन दुचाकीस्वार फरार झाला. मढेवडगांव येथील घोड कॅनॉल वर हा विचित्र अपघात झाला.हा विचित्र अपघात रिक्षा,चारचाकी आणि एक दुचाकी एकमेकांना धडकून
झाला.शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा रस्ता डेंजर झोन म्हणून ओळखला जात असून येथून ये-जा करण्यास नागरिकांना भिती वाटू लागली आहे. या प्रकाराकडे लक्ष देत सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे गतिरोधक तयार करण्याची तर पोलीस विभागाने वाहतुकीवर नियंत्रणासाठी व्यवस्था करण्याची मागणी मढेवडगांव येथील नागरिक करीत आहेत. रस्ता तयार करताना कुठेच गतिरोधक किंवा क्राँसीग देण्यात आली नाही. तसेच दिशा दर्शकाचे फलक बसविण्यात आले पण ते चुकीच्या ठिकाणी बसविले गेले आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की,दुचाकीस्वार अवैध मार्गाने हातभट्टी दारू विक्रीसाठी दारूचा ड्रम घेऊन भरधाव वेगाने घोड कॅनॉलच्या कच्या रस्त्याने हायवेवर येऊन उभा ठाकला व भरधाव वेगाने नगर वरून दौंडच्या दिशेने स्विफ्ट कारने दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालकास जोराची धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली. या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले. त्यानंतर अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी झाली.अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असली तरी देखील या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी मढेवडगांव येथील युवकांनी तातडीने जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले.अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे