सिद्धटेक दि २८ :- श्री क्षेत्र सिद्धटेक, देवस्थान येथे अस्ताव्यस्त व रोड वर आलेली दुकाने तसेच अस्ताव्यस्त पार्किंग सिद्धटेक येथे पोलिसांना दिसून आले. त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन व सोमनाथ दिवटे सहा.पोलीस निरीक्षक, राशीन दुरक्षेत्र व राशीन दुरक्षेत्र चे पोलीस जवान यांनी ग्रामपंचायत सिद्धटेक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांचे मदतीने सर्व व्यापारी, रसवंती तसेच इतर दुकाने, रोडवर विक्री करणारे यांची मीटिंग घेतली. त्यामध्ये सर्वांना दुकाने, रसवंती मागे घेण्याबाबत तसेच नीटनेटकेपणा आणि स्वछता ठेवणेबाबत सूचना दिल्या. सर्व व्यापारी यांनी सुद्धा त्याकामी सहमती दर्शविली. त्यानंतर मुख्य प्रवेशदाराचे आतमधील तसेच बाहेरील
रोड वर आलेली सर्व दुकाने, हॉटेल ही पाठीमागे सरकविली. मंदिराचे समोर असणाऱ्या मोकळ्या जागेच्या समोरच रोडला लागूनच असलेली दुकाने मागे घेतली. सदर दुकानासमोर पोलीसानी एक लाईन मारली असुन त्याचे आतच दुकान दाराने आपले दुकान लावायचे आहे. त्यानंतर रोड प्रशस्थ झाला, पार्किंग साठी काही प्रमाणात जागा मंदिरासमोर उपलब्ध झाली. नीटनेटकेपणाने परिसर छान दिसू लागला. सर्व दुकाने एका लाईन मध्ये लावून घेतली जेणेकरून भाविकांना मंदीरा मध्ये जाताना अडचणीचे होणार नाही, मंदिराला ही देखणे रूप प्राप्त होईल अशा प्रकारे दुकाने सजवली आहेत.सदरचे कारवाई चे भाविकांकडून स्वागत होत असुन सिद्धटेक गणपती हे आष्टविनायक पैकी एक असुन भाविकांना सोयी सुविधा मिळाले नंतर या ठिकाणी भाविकांची संख्येत नक्कीच वाढेल असे मत स्थानिकांनी तसेच बाहेरगावच्या भाविकांनी व्यक्त केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक.सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी. अण्णासाहेब जाधव,यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशन चे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक,कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत राशीन पोलीस दुरक्षेत्राचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,पोलीस जवान भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, मनोज लातूरकर, गोवर्धन कदम यांनी सिद्धटेक बेर्डी ग्रामपंचायतचे सुजित गायकवाड-सरपंच, अमोल भोसले,-उपसरपंच, पवार
सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तसेच श्री सिद्धटेक देवस्थान यांच्या मदतीने केली..