पुणे ग्रामीण दि ०१ : -दौंड शासकीय रूग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी करोनाच्या रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल देण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुणे लाचलुपतत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी)ने उघडकीस आणला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे.या प्रकरणी मिलिंद दामोदर कांबळे ( वय 38) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. राज्यात देखील काही ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे, तर टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेआहे.एकीकडे नागरिक हैराण आहेत. त्यात आता कोरोनात देखील लाचखोरी शिरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दौड शासकीय रुग्णालयात कांबळे हे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ते काम करतात. या रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली जाते.
दरम्यान यातील तक्रारदार व त्यांच्या 19 कामगारांनी शासकीय रुग्णालय दौड 26 फेब्रुवारी रोजी केस पेपर काढून कोविड 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या आहेत. त्याचा अहवाल देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी प्रत्येकी 100 रुपये असे एकूण 1 हजार 900 रुपये लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. त्याची पडताळणी करण्यात येत होती. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडीअंती दीड हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने लोकसेवक कांबळे यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
गुन्हयाचा तपास . सुनिल बिले , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट करत आहेत .सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास नमुद क्रमांकवर सपंर्क 1064 साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे