काळेवाडी फाटा येथे वाहनांची चेकिंग करत असताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पोलिसाला फरपटत नेऊन जखमी करून आरोपी पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली आहे.तुकाराम अर्जून मगर (वय ३०, रा. गजानन नगर, काळेवाडी फाटा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची तीन पथके तयार करण्यात आली. आरोपी तुकाराम मगर याच्याही मागावर पोलीस होते. काळेवाडी फाटा येथे पहाटे पाचच्या सुमारास चारचाकी .आरोपी तुकाराम अर्जुन मगर यास सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अंमलदार संतोष बर्गे , पोहवा संदीप गवारी , पोना महेश बारकुले , पोना विष्णु भारती हे त्यास शोधुनताब्यात घेण्यासाठी पहाटे ०५:०० वा चे सुमारास आरोपीचे मागावर काळेवाडी फाटा येथे येवुन आरोपीची गाडी क्रमांक एमएच १४ एफ सी १६०२ यास हात दाखवुन थांबविले असता वाहनामध्ये चालक सीटवर असलेल्या तुकाराम मगर याला पोलीस स्टाफने आम्ही पोलीस आहोत असे सांगितले . त्यानंतर त्याने तुमचे पोलीस ओळखपत्र दाखवा असे म्हटल्याने पोहवा संतोष बर्गे यांनी पुढे येवुन पोलीस ओळखपत्र दाखविले असता आरोपीने गाडीच्या काचा एकदम जोरात वरती केल्या त्यामध्ये पोहवा संतोष बर्गे यांचा हात अडकल्याने पोहवा संतोष बर्गे यांना १५-२० फुट अंतरावर फरपटत नेवुन जखमी केले . तसेच गाडीसमोर उभे असलेले पोहवा संदीप गवारी यांचे अंगावर गाडी घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेला . त्यानंतर पोलीस स्टाफने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हयाचे तपास वाकड पोलीस करीत आहेत .