श्रीगोंदा दि १३ :- जबरी चोरी, दरोड्यासारख्या 8 गुन्ह्यातील आरोपी शंभू कुंज्या चव्हाण वय 35 वर्षे रा. सुरेगाव याला श्रीगोंदा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोंबिंग ऑपरेशन करत येळपणे शिवारात अटक केले. त्याच्यावर बेलवंडी, शिरुर, पारनेर या ठिकानी गुन्हे दाखल असून त्याला पुढील तपास कामी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांनी दिलेल्या कोंबिंग
ऑपरेशनच्या आदेशानुसार १२ मार्च रोजी रात्री १ ते पहाटे ५ च्या दरम्यान येळपणे, चिंभळा, मढेवडगाव परीसरात कोंबिग करत असताना येळपणे शिवारात रेकाॅर्डवरील सराईत अट्टल दरोडेखोर शंभू कुंज्या चव्हाण वय 35 वर्षे रा. सुरेगाव ता.श्रीगोंदा हा मिळुन आला. त्याच्या बाबत अधिक माहिती घेतली असता. त्याच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल असून, शिरुर, पारनेर याठिकाणी प्रत्येकी १ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.त्याला पुढील तपास कामी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलिस निरिक्षक दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके,पोकॉ किरण बोराडे,पोकॉ गोकुळ इंगवले यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे