श्रीगोंदा:दि ११ :-सध्या संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे तरी देखील समाजाचे आपण काहीतरी देने लागतो या भावनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्च टाळून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते विजय हरिहर यांनी श्रीगोंदा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप केले.विजयच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्याने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. योग्य खबरदारी घेतल्यास कोरोना संसर्ग आपण रोखू शकतो त्याच अनुषंगाने सामाजीक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते विजय हरिहर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून श्रीगोंदा तालुक्यातील पोलीस स्टेशन व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.कोरोना महामारीच्या परिस्थितीत पोलीस व आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले संरक्षण करत आहेत. हे पाहून विजय हरिहर ने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळीसामाजिक कार्यकर्ते विजय हरिहर, मढेवडगांवचे ग्रा.प.सदस्य दीपक गाडे,सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप,स.पो.नि.दिलीप तेजनकर,नवले दादा,भारती दादा आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे