पुणे दि ०४ : बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपासमोर रोडवर पडलेल्या एका दगड चुकवण्या मध्ये डिवाडरला धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यावरून पलटी झाली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गणेश सोमेश्वर घनचक्कर (वय 25) असे मृत्युमुखी पडलेल्या कार चालकाचे नाव आहे. तर साहिल मधुकर कुलकर्णी आणि सचिन सतिश जाधव हे दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक वनवे यांनी फिर्याद दिली असून चतुर्श्रुंगी पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाणेर कडे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे तिघे जण कारमध्ये बसून जात होते. गणेश घनचक्कर हा कार चालवत होता. त्याची गाडी बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपावर जवळ आली असताना रोडच्या मध्ये दगड एक पडल्यामुळे दगडाला चुकवण्याच्या नादात डिवाडरला धडकून नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला.पुढील तपास पो.उप.निरी कपिल भालेराव हे करत आहे