श्रीगोंदा दि ०४ :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातही लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी म्हणून गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली आहे.यात ग्रामिण भागात भरणाऱ्या गाय-म्हशींच्या बाजावरही बंदी घालण्यात आली आहे.असे असतानाही वांगदरी गावात म्हशींचा खरेदी विक्रीचा बाजार भरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रयत्न श्रीगोंदा पोलिसांनी हाणून पाडला.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दर शनिवारी जनावरांचा आठवडी बाजार भरत असतो.पण कोरोनामुळे शासनाने आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, दि.३ मे ला म्हशींचा बाजार भरवून खरेदी विक्री करण्याची बंदी असतानाही दोन व्यक्ती वांगदरी ते मासाळवाडी शिवारात रस्त्यावर विनाकारण फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली असताना देखील आदेशाचे उल्लंघन करून तसेच विनामास्क म्हशींचा व्यापार करताना सकाळच्या सुमारास पेट्रोलिंगवेळी पी.एस.आय अमित माळी व पोलीस कर्मचारी यांना आढळून आले असता.पोलीस कर्मचारी यांनी तुम्ही रस्त्यावर म्हशींचा व्यापार करता काय अशी विचारपूस केली असता त्यांच्याकडून काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही व त्यांच्या अशा या कृत्यामुळे जीवितास धोका असलेल्या कोरोना संसर्ग आजार पसरण्याचा अधिक संभव असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विजय दौलत पवार, रा.बेलवंडी स्टेशन,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर व भाऊसाहेब छबु गजर रा.ढोकराई, ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर यांच्या विरुद्ध परवानगी नसतानाही म्हशींचा खरेदी विक्रीचा व्यापार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी भादवि कलम १८८,२६९,२७०नुसार व साथ रोग प्रतिबंध कायदा कलम २,३,४ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय अमित माळी,पो.ना.मुकेश बडे,पो.कॉ.कुलदीप पांडुरंग घोळवे,पो.कॉ.संदीप श्रीराम शिरसाठ,होमगार्ड प्रशांत बंडू गदादे,सतीश शिवाजी जाधव यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे