पुणे दि ०६: रक्तदान हेच जीवनदान आहे, रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे असतानाच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊनमुळे पुण्यात रक्ताचा कमालीचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांसह अन्य रुग्णांनाही रक्ताची नितांत आवश्यकता आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावं या उद्देशाने सोमेश्वर देवस्थान, विठ्ठल सेवा मंडळाच्या वतीने व मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पाषाण, येथील सोमेश्वरवाडीतील (पेठ जिजापूर) सोमेश्वर मंदिरात येथे आयोजित केले होते व महा रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त औचित्य साधून सोमेश्वर देवस्थान व विठ्ठल सेवा मंडळ सहकार्याने आयोजित या महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यामध्ये तब्बल ४३८ बँगा रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रक्तदान शिबिराची नियोजित सकाळी 9. वाजेपासून दुपारी 4 पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान यामधील अनेक रक्तदात्यांना एचबी आणि अगोदरच लस घेतली असल्याने परत जावं लागलं, अन्यथा
जवळपास ४३८ बँगा रक्त संकलन झाले आहे. रक्तदान शिबिरात सहभागी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले.आसुन
‘अनेक सेवाभावी संस्था, गैरसरकारी सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. त्यामुळेच देशात आवश्यक तेवढा रक्त साठा उपलब्ध होईल’, असं कळकळीचे आवाहन मा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी होते व आवाहनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत त्यांच्या कार्याचे कौतुक केलं.आहे
यावेळी अजय काकडे, अविनाश गायकवाड, बाळासाहेब बामगुडे, विनय निम्हण, राहुल आगलावे, संतोष जोरे, हेमंत डाबी, निलेश राखपसरे, गणेश गरुड, शंभो जाधव, तेजस शेवणे, विक्रम शिंदे, पंकज चव्हाण, सागर काळे, संजय तारडे,व कार्यकर्ते हि उपस्थित होते.
सामाजिक व राजकीय प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे