पुणे, दि.१८:- शिवाजीनगर हे पुणे शहरातील मुख्य गर्दीचे ठिकाण असल्याने , येथे उभारण्यात येणारे एसटीचे बसस्थानक अत्याधुनिक पध्दतीने निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री अँड अनिल परब यांनी आज केले. ते पुढे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देऊन भविष्यात कमीत कमी वेळात बसस्थानकाची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल. या साठी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती पहाणे, त्या अनुषंगाने बसस्थानकाची उभारणीचे नियोजन करणे, हे या प्रत्यक्ष भेटीचे प्रयोजन होते.तथापि,आज परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज शिवाजी नगर येथील रा.प. महामंडळाच्या जागेवरील मेट्रो कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने,रा.प. महामंडळ वास्तुविशारद व महाव्यवस्थापक (बांधकाम) भूषण देसाई, मेट्रोचे अतिरिक्त मुख्य अभियंता राजेश जैन यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
सामाजिक, राजकीय,व पर्यटन,पुणे प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे