पुणे दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी विशेष मोहिम सुरु केली आहे. परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे इत्यादी कामकाज सुरू आहे. त्यानुसार 209 शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या एकूण 30 हजार 773 मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत असल्याची माहिती 209 शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अस्मिता मोरे यांनी पत्रकान्वये दिली आहे.
ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे, परंतु छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आठ दिवसांच्या आत त्यांचे छायाचित्र 209 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ, अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, अ बरॅक, मध्यवर्ती इमारत, पुणे स्टेशन, पुणे या कार्यालयात जमा करावे. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या आवाहनानंतरही ज्या मतदारांचे छायाचित्र प्राप्त होणार नाहीत, अशी नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 209 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ श्रीमती अस्मिता मोरे यांनी दिली आहे.