पुणे दि २६ :-‘माणगांव परिषद १९२०’या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दीपूर्तीनिमित्त विशेष लघुपटाचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले.लोकराजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या जन्मदिनी, दि. २६ जून २१ रोजी लोकार्पण झाले आणि इतिहासाचे पान उलगडले गेले. माहिती व जनसंपर्क विभाग कोल्हापूर विभागाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे असून निर्मिती’ रिडिफाईन कन्सेप्टस् ‘ने केली आहे. ‘रिडिफाईन कन्सेप्टस् ‘ हे पुण्यातील ऑडियो -व्हिजुअल प्रॉडक्शन हाऊस आहे.राजर्षी शाहूमहाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा लघुपट तयार करण्यात आला आहे.’आतापर्यंत नाटक ,चित्रपट,जाहिराती आणि अनेक लघुपट केलेले असले तरी ‘माणगाव परिषद १९२०’ लघुपटाने इतिहासाला उजाळा देण्याची गौरवास्पद संधी दिली.सामाजिक परिवर्तनाला बळ देणाऱ्या या परिषदेला लघुपटाच्या रूपाने पडद्यावर साकारणे हे आव्हान होते. कोविड साथीच्या काळात सर्व नियम पाळून वेळेत निर्मिती पूर्ण करणे हेही आव्हान होते.ते पूर्ण झाल्याने कर्तव्य पूर्तीचा आनंद मिळाला’,अशी भावना योगेश देशपांडे यांनी व्यक्त केली.त्यांनी माहिती खात्याचे अधिकारी प्रशांत सातपुते यांचे आभार मानले.
या लघुपटाचे चित्रीकरण न्यू पॅलेस ,कोल्हापूर शहर आणि परिसरात झाले . त्यात श्रीकांत देसाई (शाहू महाराज ),राहुल लामखेडे (डॉ आंबेडकर ) यांनी अभिनय केला आहे. सहदिग्दर्शक अपूर्व मोडक ,छायाचित्रण विजू सुर्वे ,संगीत आनंद कुर्र्हेकर ,तसेच मोनाली पवळे,रोहिणी लायकर यांचे योगदान या लघुपटाला लाभले .
रिडिफाइन कन्सेप्ट या संस्थेने आधी अनेक राष्ट्रीय ,अंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स साठी जाहिरात पट ,टीव्ही जाहिराती केल्या आहेत. बेस्ट फिचर फिल्म रायटर ,बेस्ट डायरेक्टर ,बेस्ट एड फिल्म पुरस्कार मिळाले आहेत ,अशी माहिती योगेश देशपांडे यांनी दिली.ऑनलाईन लोकार्पण सोहळयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माहिती जनसंपर्क खात्याचे महासंचालक डॉ. विजय पांढरपट्टे, अनिरुध्द अष्टपुत्रे अशा मान्यवरांनी लघुपटाचे कौतुक केले