पुणे दि ०२ :- पुणे शहरातील पाषाण परिसरातील संध्यानगरमधील श्री गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कै.गणेश रामेश्वर आप्पा घनचक्कर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन अनाथ आश्रमांमधील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आला. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने तसेच अनाथ मुलांनाही जीवनात आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळावी या हेतूने
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प बावधन पुणे, तसेच वडगाव बुद्रुक येथील आजोळ आनाथ आश्रमातील मुलांसोबत कै. गणेश यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमास श्री गणेश मित्र मंडळ , स्वराज प्रतिष्ठान ( संध्यानगर , सोमेश्वरवाडी,पाषाण पुणे .) या मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते .मंडळाचे वरिष्ठ कार्यकर्ते, झुंजार न्यूज चॅनल चे संपादक संतोष काळे, तसेच सतीश जाधव, विक्रम शिंदे, पंकज चव्हाण, अभिजीत कोरके,अक्षय सावंत, विजय कुटे, कौस्तुभ तिडके,बाजीराव बोरुळे,सागर काळे, यांच्या मार्गदर्शनाने.
सामाजिक व राजकीय प्रतिनिधी पुणे संकेत संतोष काळे