लातुर प्रतिनिधी दि ०२ :- लातुर जिल्हातील निलंगा तालुक्यातील केळगावत बौद्ध समाजातील कांबळे कुटुंबीयांनी गावातील एका शेती मालकाची शेत जमीन चार ते पाच महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असून.सर्वत्र पेरणी व मशागतीची कामे चालू असल्याने दिनांक १ जुलै रोजी.केळगावतील शत्रूघन लहू कांबळे त्यांची पत्नी लक्ष्मी कांबळे दोन मुली प्रतीक्षा आणि प्रज्ञा व चार वर्षाचा मुलगा भिवा लखन कांबळे हे कांबळे कुटुंब शेताकडे शेतातील काम करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतातील शेजारी शेतकरी यांनी आमच्या मराठा समाजाची शेतजमीन तुमी खरेदी का केली तुमची औकात आहे का आमच्या जमिनी खरेदी करण्याचे तुमी महार आमच्या शिळ्या तुकड्यावर जगणारे तुमी आमची चाकरी करणारे लोक ही शेत जमीन तुमी करायची नाही .असे म्हणत लक्ष्मण जोतिराम पाटील, किशन रमेश पाटील ,जागृती लक्ष्मण पाटील, मीरा रमेश पाटील सुक्षेनबाई त्रिमूक पाटील,या वरील सर्वांनी मिळून शेतात येऊन आमाला मारहाण केले , व जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ महारगे लय माजलाव असे म्हणत शेतात पाऊल सुद्धा टाकायचा नाही म्हणत माझी बायको आणि भावजय मारहाण करत त्यांना खाली पडून त्यांचा विनयभंग करून आमच्या सोबत असणारा माझा चार वर्षाचा मुलगा भिवा याला दोन ते चार वेळा खाली आपटले व तुमचा वंशज पण संपवून टाकतो .पुन्हा तुमची खैरलांजी सारखी अवस्था करतो म्हणत या जातिवाद्यांनी आम्हाला धमकी दिली आहे.कांबळे कुटुंबीयांनी या अगोदर निलंगा पोलीस स्टेशन व लातुर पोलीस मुख्यालयात लेखी तक्रार दिली होती .की या पाटील मंडळींकडून आमच्या जीवाला धोका आहे ते पाटील आम्हाला जिवेमरण्याच्या धमक्या देत आहेत म्हणून पोलीस संरक्षण देण्यात यावे व पाटलावर कार्यवाही करावी पण पोलिसांनी त्यांचेवर गुन्हा दाखल केला पण कार्यवाही काहीच केली नाही .जर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करून त्यांना अटक केली असती तर आज ही आमच्यावर वेळ आलीच नसती .जर आज या मारहाणीत लहान मुलगा भिवा लखन कांबळे याचा जीव गेला असता तर याला कोण जाबाबर असे असा सवाल कांबळे कुटुंबियांना प्रतिनिधीशी बोलताना केला आहे आरोपीला हे अजून ही मोकाट फिरत आहे याचेवर सक्त कार्यवाही व्हावी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा असे ही ते म्हणाले
औसा ता. लातूर जिल्हा :-लक्ष्मण कांबळे